COVID-19 (Photo Credits: IANS)

अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचा दिवसागणिक वाढणारा आकडा आणि मृत्यूदर स्थानिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. दरम्यान या कोरोना व्हायरस वरून अमेरिका आणि चीन मध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैरीदेखील सुरू झाल्या आहेत. अमेरिकन राष्ट्राध्याक्ष डॉनल्ड ट्रम्प पाठोपाठ आता US Secretary of State Mike Pompeo यांनीदेखील चीनवर निशाणा साधत जगभरात पसरणार्‍या कोरोनाच्या फैलावाला चीनला जबाबदार धरलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काल 24 तासामध्ये अमेरिकेत सुमारे 1,891 बळी गेले आहेत तर कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 38 हजारांच्या पार गेला आहे. दरम्यान न्यू यॉर्क शहरामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. Coronavirus: चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे इंटर्नकडून चुकून लीक झाला कोरोना व्हायरस- Report.  

Mike Pompeo यांनी News Fox सोबत बोलताना, ' चीन मधील शी जिंगपिंग सरकारने कोरोना व्हायरस जागतिक संकटाबद्दल चुप्पी तोडली पाहिजे. ते म्हणतात आम्ही सहकार्य करू. जर त्यांची सहकार्य करण्याची तयारी असेल तर जगाला त्यांनी हे सांगितलं पाहिजे की नेमकी कोरोना व्हायरसची उत्पत्ती आणि प्रसार नेमका कसा सुरू झाला?' दरम्यान डॉनल्ड ट्रम्प यांनी देखील कोरोना व्हायरसच्या प्रसराबाबत चीनची भूमिका आणि माहितीची पारदर्शकता ठेवणं याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता डॉनल्ड ट्रम्प पाठोपाठ माईक यांनीदेखील चीन सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

दरम्यान चीन मधील वुहाँन शहरामधून कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली. नोव्हेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहाँनमध्ये पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर झपाट्याने कोरोना व्हायरस पसरला. अअता कोरोना व्हायरसने जगभर हात पाय पसरायला सुरू केली आहे. आजच्या घडीला सुमारे 20 लाखापेक्षा अधिक लोकांना जगभरात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.