Global Unemployment 2020: यंदाच्या वर्षी 2.5 दशलक्ष इतक्या प्रमाणावर वाढणार बेरोजगारी: जागतीक कामगार संघटना अहवाल
Global Unemployment 2020 | (Photo Credits: PixaBay)

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (International Labor Organization) म्हणजेच आयएलओ (ILO) ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. हा अहवाल नोकरदार वर्गास यंदाचे वर्ष हे अत्यंत निराशाजनक ठरु शकणार असल्याचा दावा करतो आहे. अहवालात म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी (2020) बेरोजगारीचा आकडा तब्बल 2.5 अब्ज पर्यंत वाढू शकतो. 'वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अॅण्ड सोशल आउटलूक: ट्रेण्ड्स 2020' (World Employment and Social Outlook: Trends 2020) अर्थातच (WESO-डब्ल्यूईएसओ) नुसार जगभरात आर्धा अब्ज लोक जितके काम करत आहेत त्याच्याही पेक्षा कमी वेतनावर अधिक लोक अधिक तास काम करत आहेत. करु शकतात त्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या कौशल्य आणि अनुभवानुसार काम मिळण्याची शक्यता कमी आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, रोजगार आणि समाजिक बदल यांवर आयएलओचा अहवाल सांगतो की, वाढती बेरोजगारी आणि असमानता वाढण्यासोबतच योग्य कामाची कमी असल्यामुळे असंख्य लोकांना आपल्या कामातून अधिक चांगले जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे.

हा अहवाल सांगतो की, आंतरराष्ट्रीय स्तरावर बेरोजगार समजल्या गेलेल्या 18.8 कोटी लोकांपैकी 16.5 कोटी लोकांपजवळ अपूरे वेतन आहे आणि 12 कोटी लोकांनी सक्रीयपणे काम शोधणेच सोडून दिले आहे. काहींची उद्योग आणि व्यवसाय, नोकरीच्या संधी इथपर्यंत पोहोचच नाही. (हेही वाचा, CMIE अहवाल: भारतात रिकाम्या हातांची संख्या वाढली, 2016 नंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक)

आयएलओ महानिदेशक गाय रायडर यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र माहिती परिषदेत मह्टले की, जगभरामध्ये अधिकाधिक लोकांच्या चरितार्थाचे साधन हे आजही कामगार बाजारपेट किंवा कामगार क्रियाकलाप (Labor Activity) आहे. मात्र, जगभरातील वेतन कार्य, प्रकार आणि कामाची समानता तसेच त्यांच्या श्रम पाहता त्याचा बाजारात असलेला मोबदला बराच कमी आहे. किंबवून असमानसुद्धा.