World Nature Conservation PC file image

Era Of Global Boiling: जागतिक निसर्ग संवंर्धन दिन (World Nature Conservation ) 28 जुलै रोजी साजरा केला जातो.  हा दिवस निसर्ग आणि पर्यावरण यांचे महत्त्व दर्शवतो. निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे हा दिवस साजरी केला जातो. गेल्या अनेक दशकांपासून शास्त्रज्ञ पृथ्वीवरील वाढत्या उष्णतेमुळे (Heat) चिंतेत आहेत. ही उष्णता वाढणे म्हणजे पृथ्वीवरील लोकांच्या भविष्यासाठी धोक्याची बाब बनली आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी गुरुवारी हवामान बदलावर व्यक्तव्य मांडले आहे आणि असे म्हटले की जुलैमध्ये विक्रमी तापमान दिसून येत आहे. पृथ्वी तापमानवाढीच्या टप्प्यापासून जागतिक उकळत्या युगात बदलली आहे.

न्यूयॉर्कमध्ये बोलताना, सरचिटणीस यांनी उत्तर गोलार्धातील उष्णतेच्या लाटेचे वर्णन "क्रूर उन्हाळा" असे केले. ते पुढे म्हणाले की "संपूर्ण ग्रहासाठी, ही एक आपत्ती आहे. म्हणजेच पृथ्वीतलावर आपत्ती आहे. सतत हवामानातील बदल आपत्तीजनक आहे आणि ही फक्त सुरुवात आहे."शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, 2023 मध्ये जिथे लोकांना उष्णतेमुळे खूप त्रास होत आहे, तिथे 2024 मध्ये आणखी त्रास होऊ शकतो. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पुढील वर्ष म्हणजे 2024 अधिक उष्ण असेल. आगामी काळात मानवासह इतर सजीवांना पृथ्वीवर राहणे कठीण होणार आहे.