गेल्या अनेक दिवसांपासून देशात उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे. आता याबाबत नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, पूर्व भारत आणि लगतच्या भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती उद्यापासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. आयएमडीने सांगितले की, ओडिशा, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या 9 ते 12 दिवसांपासून पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, गंगा पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि विदर्भात गेल्या 6 ते 8 दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. मात्र पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून पूर्व पाऊस न झाल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: राज्यात मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा)
IMD predicted that #heatwave conditions over East India and adjoining areas are likely to abate gradually from tomorrow onwards.
IMD said, Heat Wave to Severe Heat Wave conditions have been prevailing over #Odisha, Jharkhand, #Telangana and north Coastal Andhra Pradesh for last…
— All India Radio News (@airnewsalerts) June 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)