पाठिमागील काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढली आहे. तापमान विशेष वाढत नसले तरी, हवेतील आर्द्रता घटल्याने उन्हाचे चटके अधिक बसत आहे. परिणामी नागरिकांना उकाडा आणि घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळीही उकाडा वाढला असून, यंदा उन्हाळा काहीसा अधिकच असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील हवामान घ्या जाणून
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २५°C च्या आसपास असेल.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)