Maharashtra Weather Forecast: राज्यात मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

आता लवकरच मान्सूनचंमुंबईत आगमन होणार आहे. यासंबंधी मुंबईच्या हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. येत्या 72 तासांमध्ये मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Forecast: राज्यात मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain (Image Credit - ANI Twitter)

राज्यात अद्याप मान्सून (Monsoon) दाखल झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. मुंबई (Mumbai) आणि इतर शहरातील पाण्याचा साठा देखील आटत असल्याने पाण्याच्या कपातीला सामोरे जावे लागू शकते. मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला फटका दिला. त्यामुळे आता राज्यात मान्सूनचा पाऊस कधी पडेल? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आता लवकरच मान्सूनचं (Monsoon Update) मुंबईत आगमन होणार आहे. यासंबंधी मुंबईच्या हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. येत्या 72 तासांमध्ये मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.

पाहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).