रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia-Ukraine War) एक महिना होत आला आहे. युक्रेनमधील अनेक शहरे युद्धात उद्ध्वस्त झाली आहेत. रशियालाही खूप त्रास होत आहे. तरीही दोघांपैकी कोणीही पराभव स्वीकारण्यास तयार नाही. रशियाच्या हल्ल्यांना युक्रेनचे लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे. शुक्रवारी दोन युक्रेनियन लष्करी हेलिकॉप्टरने रशियातील बेल्गोरोडमध्ये प्रवेश केला. युक्रेनियन हेलिकॉप्टरने बेल्गोरोडमधील इंधन डेपोवर हवाई हल्ला केला. यानंतर आग लागली, ज्यामुळे अनेक स्फोट झाले. युक्रेनच्या लष्कराने रशियन सीमेत घुसून प्रत्युत्तर देण्याची ही पहिलीच वेळ आहे. बेल्गोरोडचे गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह यांनी टेलीग्राम या मेसेजिंग अॅपवर सांगितले की, कमी उंचीवर सीमा ओलांडल्यानंतर हेलिकॉप्टरने इंधन डेपोवर हल्ला केला. त्यामुळे डेपोला आग लागली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tweet
⭕️🇷🇺 #Russia: A helicopter is used to extinguish a fire at an oil depot in #Belgorod, which was attacked by Ukrainian helicopters this morning. pic.twitter.com/UoOu7PjKmR
— 🅻-🆃🅴🅰🅼 (@L_Team10) April 1, 2022
ग्लॅडकोव्ह म्हणाले की, आगीत 2 कामगार जळून खाक झाले आहेत. त्यानां जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शहरालगतचे काही भाग रिकामे केले जात आहेत. तथापि, रशियन तेल कंपनी रोझनेफ्ट आणि या इंधन डेपोच्या मालकाने स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे कारण सांगण्यास त्यांनी नकार दिला. (हे देखील वाचा: Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना धक्का, MQMP ने पाठिंबा काढला, पीटीआय सरकारने बहुमत गमावले)
Tweet
An oil depot is on fire in #Belgorod, #Russia.
"The emergency services went to the place of fire, measures are being taken to eliminate it", said Gladkov, the governor of the region in his Telegram channel. pic.twitter.com/ey7rC5ChSz
— NEXTA (@nexta_tv) April 1, 2022
वास्तविक, बेल्गोरोडमध्ये रशियन सैन्याने दुसऱ्या महायुद्धात बंकर आणि खंदक बांधले होते. येथे 1943 मध्ये खुर्स्कची प्रसिद्ध लढाई झाली. ही सर्व शस्त्रे आणि लष्करी बाईक आणि वाहने बेल्गोरोड मॉस्कोपासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर आहे. महामार्गाने येथे पोहोचण्यासाठी सुमारे 10 तास लागतात. वाटेत ठिकठिकाणी पोलीस आणि लष्कर तैनात आहे. बेल्गोरोड सीमा युक्रेनच्या खार्किव तसेच सुमी क्षेत्राला लागून आहे.