ऐकायला आणि वाचायला थोडे विचित्र वाटेल. पण, युगांडा (Uganda) येथील एका व्यक्तीच्या पादावर (वायू उत्सर्जन) संशोदन होणार आहे. जो रिवामीरामा (Joe Rwamirama) असे या व्यक्तीचे नाव आहे. म्हणे जो रिवामीरामा याचा पाद (Fart) म्हणजे भलताच 'किलर गॅस' आहे. दावा केला जातो की, हे जो रिवामीरामा नामक गृहस्थ घरात पादल्यास त्यांना गुडनाईट वगैरे सारखी डास (Mosquitoes) पळवणारे औषधे किंवा ओडोमॉसवगैरेसारख्या क्रीम वापराव्या लागत नाहीत. या महोदयांच्या पादाच्या वासात अशी काही जादू किंवा गूढ ताकद आहे की, हे महोदय पादले की, काही वेळातच म्हणे डास पळून जातात किंवा मृत्यू पावतात. त्याच्या या गूढ पादाचे रसस्य पाहून एका कंपनीला त्याच्यात भलतेच स्वारस्य वाटले. आता म्हणे त्या कंपनीने जो रिवामीरामा (Joe Rwamirama) महोदयांना चक्क करारबद्द केले आहे.
जो रिवामीरामा (Joe Rwamirama) महोदयांच्या या विशेष कामगिरी आणि त्याच्यावर होत असलेल्या संशोधनाबाबत 'द सन' नावाच्या इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. द सनच्या वृत्तानुसार, वय वर्षे 48 असलेले जो रिवामीरामा हे गृहस्थ युगांडा येथील कांपाला (Kampala) येथे राहतात. हे गृहस्थ कांपाला शहरातही चांगलेच प्रसिद्ध आहेत. तुम्हाला जर डासांचा त्रास होत असेल, चावणाऱ्या डासांपासून मुक्ती हवी असेल तर, जो रिवामीरामा (Joe Rwamirama)यांच्यासोबत फिरा असा विनोदही केला जातो. जो रिवामीरामा यांची किर्ती इतकी पसरली की, एका कंपनीने त्यांच्या पादावर संशोदन करण्यासाठी त्यांच्यासोबत करारही केला. ही कंपनी डास आणि कीटक पळवण्याची औषधे बनवते. आता जो रिवामीरामा यांच्या पादातून कोणत्या प्रकारचा वायू बाहेर पडतो. त्यात कोणते घटक आहेत, जेणेकरुन डास मरतात, किंवा पळून जातात, यावर संशोधन करणार आहे. (हेही वाचा- Kenya: संसदेत सदस्याच्या पादण्याच्या उग्र वासामुळे कामकाज 10 मिनिटासाठी केले तहकूब, संसदेत मारावा लागला रुम फ्रेशनर)
'द सन' ला दिलेल्या मुलाखतीत जो रिवामीरामा धक्कादायक दावा करतात. या दाव्यात ते म्हणतात की, 'माझ्या वायू उत्सर्जनात (पाद) इतकी ताकद आहे की, ज्याचा प्रभाव चक्क सहा माइल्स म्हणजे दोन किलोमीटर इतक्या व्यासात आढळतो. आजवर माझ्या गावात कोणत्याही व्यक्तीला मलेरिया झाला नाही. या निरोगीपणाचे श्रेय माझ्या पोटातील शक्तीला जाते. माझ्या पोटातील वायू शक्तीमुळे परिसरातील डास मृत्यू पावतात', असा दावाही रिवामीरामा करतात. (हेही वाचा, सूरत: इथे होणार भारतातील पहिलीवहिली 'पादण्याची' स्पर्धा; मोठ्या आवाजात आणि लयीत पादणा-या विजेत्यास मिळणार इतक्या किंमतीचे बक्षीस, वाचा सविस्तर)
आपला दावा कायम ठेवत रिवामीरामा पुढे म्हणतात, 'माझ्या या कर्तबगारीमुळे माझ्या शरहातील जवळपास सर्वच लोक मला ओळखतात. डास मारण्याची शक्ती असलेला व्यक्ती, अशी माझी परिसरात ओळख आहे.' विशेष म्हणजे रिवामीरामा याच्या दाव्याची स्थानिक लोकही पुष्टी करतात. जेम्स येवरी नावाचा एक स्थानिक सांगतो की, रिवामीरामा यांच्याकेड डास मारण्याची अद्भूत शक्ती आहे. ज्यामुळे परिसारत मलेरियाच्या डासांची पैदास होत नाही. परिसात कोणाला मलेरिया झाला किंवा डासांची पैदास वाढली तर, रिवामीरामा हे आपला अद्भूत पाद (वायू उत्सर्जन) सोडतात. ज्यामुळे डास मरतात. त्यांची अशी कृती म्हणजे मलेरियापासून सर्वासामान्यांचा बचाव अशीच आहे', असेही जेम्स येवरी सांगतो.