सूरत: इथे होणार भारतातील पहिलीवहिली 'पादण्याची' स्पर्धा; मोठ्या आवाजात आणि लयीत पादणा-या विजेत्यास मिळणार इतक्या किंमतीचे बक्षीस, वाचा सविस्तर

येत्या 22 सप्टेंबरला सूरत येथे 'What The Fart' ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सर्वात मोठ्या आवाजात पादणा-या व्यक्तीला ट्रॉफीसह 15,000 रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहेत. ही स्पर्धा भारतातील पहिलीवहिली 'पाद स्पर्धा' असणार आहे. याआधी ब-याच देशांमध्ये ही स्पर्धा झाली आहे.

सूरत: इथे होणार भारतातील पहिलीवहिली 'पादण्याची' स्पर्धा;  मोठ्या आवाजात आणि लयीत पादणा-या विजेत्यास मिळणार इतक्या किंमतीचे बक्षीस, वाचा सविस्तर
Representative Image (Photo Credits: Pixabay)

आजपर्यंत आपण नृत्य, गायन, वक्तृत्व, क्रिडा यांच्या स्पर्धा पाहिल्या आहेत आणि ऐकल्याही आहेत. पण तुम्ही भारतात उत्तम पादण्याची स्पर्धा ऐकली आहे का? नाही ना. पण असं होणार आहे ते ही भारतात प्रथमच. येत्या 22 सप्टेंबरला सूरत येथे 'What The Fart' ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सर्वात मोठ्या आवाजात पादणा-या व्यक्तीला ट्रॉफीसह 15,000 रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहेत. ही स्पर्धा भारतातील पहिलीवहिली 'पाद स्पर्धा' असणार आहे. याआधी ब-याच देशांमध्ये ही स्पर्धा झाली आहे.

तुम्ही कधी चुकून कोणाच्या समोर पादलात किंवा कोणी पादलेले ऐकलात तर अशा वेळी तुमची किंवा त्या समोरच्या व्यक्तीची खूपच नाचक्की होते. अनेकांना तर अगदी मेल्याहून मेल्यासारखं होते. पण ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याला आपण कितीही टाळले तरी ते बाहेर पडू शकते. हे वाचताना कदाचित तुम्हाला हसायला येईल पण हे खरे आहे. मात्र आता याच पादणा-या लोकांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण होणार येत्या 22 सप्टेंबर ला. सूरतमध्ये 'WTF' ही स्पर्धा रंगणार आहे. जेथे उत्तम आणि मोठ्या आवाजात पादणा-या व्यक्तीला भरघोस बक्षीसं आणि काही रक्कम दिली जाणार आहे.

हेही वाचा- Kenya: संसदेत सदस्याच्या पादण्याच्या उग्र वासामुळे कामकाज 10 मिनिटासाठी केले तहकूब, संसदेत मारावा लागला रुम फ्रेशनर

48 वर्षीय गायक व अभिनेता यतिन संगोई आणि त्यांचे सहकारी मुल संघवी यांची ही अनोखी कल्पना आहे. अशी स्पर्धा चीन, अमेरिका या देशांमध्ये होत असतात. इतकंच नव्हे तर त्याचा वर्ल्ड कपसुद्धा आहे. पण भारतात आतापर्यंत अशी स्पर्धा झालीच नाही. त्यामुळे या स्पर्धेला घेऊन आम्ही खूपच एक्सायटेड आहोत.

या स्पर्धेत मोठ्या आवाजात व एका लयात पादणाऱ्या व्यक्तीला ट्रॉफीसोबतच पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहे. केवळ 100 रुपये भरून या स्पर्धेसाठी तुम्हाला नोंदणी करता येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2019 08:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).