आजपर्यंत आपण संसदेत झालेला गदारोळ पाहिला. राडा पाहिला. या गोंधळामुळे, गदारोळामुळे संसदेचे कामकाज वारंवार तहकूब केले जाते हेही आपण पाहत आलोय. मात्र कोणा सदस्याच्या पादण्यामुळे (Fart) संसदेचे कामकाज तहकूब केलेले कधी पाहिले किंवा ऐकलं आहे का? नाही ना. पण हे खरंय. पोट धरून हसायला लावणारा हा विचित्र प्रकार घडलाय केन्याच्या (Kenya) संसदेत. येथे होमा बे काउंटी संसदेत (Assembly) मध्ये एक सदस्य असा पादला की त्याच्या उग्र वासामुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.
झाले असे की, संसदेमध्ये एका मुद्द्यावर घेऊन वातावरण थोडं तापलं होतं. त्यात सर्व सदस्य त्या मुद्द्यावर चर्चा करत होते. त्याचदरम्यान कुठून तरी घाणेरडा वास आला आणि सर्वांनी मिळून एका सदस्यावर आरोप लावला की त्यानेच पाद सोडली आहे. त्यानंतर संसदेतील सर्व सदस्य नाक दाबून एकमेकांवर आरोप लावू लागले 'तू पादला' असे आरोप लावू लागले. हा गोंधळ वाढतच गेला मात्र कोण पादला हे सांगण्यास कोणीही तयार होईना. अशावेळी या गोंधळात जूलियस गाया सदस्याने स्पीकरवर असे सांगितले की, "आपल्यापैकी कोणी तरी वायू प्रदूषित केली आहे, ज्यामुळे संपूर्ण सदनात दुर्गंधी पसरली आहे."
त्यानंतर हा उग्र वास संसदेत इतका पसरत गेला की, स्पीकर एडविन काकाछ ने संसदेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर त्वरित सर्व सदस्य संसदेबाहेर पडले.
त्यानंतर लगेचच स्पीकर ने तेथील कर्मचा-यांना संसदेत त्वरित रुम फ्रेशनर मारण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्वरित सदनात रुम फ्रेशनर मारले गेले. काही वेळाने तो उग्र वास जाताच सर्व सदस्य संसदेत आले आणि संसदेची पुढील कार्यवाही सुरु केली गेली.
हा प्रकार जितका विचित्र वाटतो तितकाच तो पोट धरून लोटपोट होऊन हसायला लावणारा आहे हे मात्र नक्की.