Uddhav Thackeray, Sharad Pawar and Rahul Gandhi | (Photo credit: archived, edited, representative image)

भारताच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीची जोरदार पिछेहाट झाली. दुसऱ्या बाजूला विरोधात असलेल्या महाविकासआघाडीला दणदणीत यश मिळाले. खास करुन पक्षफुटीनंतर मोठे आव्हान उभा ठाकलेल्या उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निर्विवाद यश मिळाले तर, एकही खासदार नसलेल्या काँग्रेसला या पुनरुज्जीवन प्राप्त झाले. दरम्यान, लोकसभा निवडणूक झाल्यावर महाविकासआघाडीला आता विधानसभा निवडणूक 2024 चे वेध लागले आहेत. त्यावरुन जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरु झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला कोणी किती जागा लढवाव्यात यावर दावे प्रतिदावेही सुरु आहेत.

महाविकासाघाडीचा फॉर्म्युला निश्चित?

महाविकासआघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सांगितले जात आहे की, मविआतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (SS) आणि राष्ट्रीय काँग्रेस आपापले प्रभावक्षेत्र आणि निवडून येण्याची क्षमता या बाबी विचारात घेऊन निर्णय घेतील. त्यामुळे कोकण आणि मुंबईत उद्धव ठाकरे, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये काँग्रेस पक्ष अधिक जागा लढवले. शिवाय, मित्रपपक्षांनाही काही जागा सोडल्या जातील अशी चर्चा आहे. (हेही वाचा, MVA in Maharashtra: लोकसभेसारख्याच विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार - पृथ्वीराज चव्हाणांची घोषणा)

जागांच्या संख्येवरुन दावे

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जागावाटपांच्या मुद्द्यावर प्राथमिक बैठका पार पडत असल्या आणि कोणीही अधिकृत माहिती देत नसले तरी तिन्ही पक्षांकडून जोरदार दावे केले जात आहेत. यामध्ये काँग्रेस 100 ते 105, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 90-95 तर काँग्रेस 80 ते 85 जागा लढविण्याची तयारी करत असल्याचे समजते. त्यामुळे तिन्ही पक्षांचे नेते वेगवेगळे दावे प्रतिदावे करताना पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा, Rahul Gandhi On EVMs in India: 'भारतात EVMs जणू 'Black Box'; कोणालाही छाननी ची परवानगी नाही, मुंबई मधील Ravindra Waikar यांच्या प्रकारणावरून राहुल गांधी पुन्हा गरजले!)

महायुतीकडून आत्मचिंतन

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्या आणि त्यासाठी अजून 4 महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी, राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी जागावाटपावर भर देत आहे तर महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) लोकसभेतील पराभवावर आत्मचिंतन करत आहेत.

दरम्यान, महाविकासआघाडीने नुकतीच एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जनतेने दाखवलेला विश्वास आणि आलेले यश याबद्दल मतदारांचे आभार मानन्यात आले. या पत्रकार परिषदेस शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच या बैठकीस जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अरविंद सावंत, जितेंद्र आव्हाड, सचिन अहीर यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीपूर्वी मविआची जागावाटपाबाबतची एक महत्त्वाची बैठक पार पडली.