प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Surgical Strike 2: भारतीय वायुसेनेच्या (Indian Air Force) आक्रमक कारवाईमुळे पाकिस्तानची (Pakistan) झोप उडाली आहे. एका बाजूला पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी संरक्षण मंत्र्यांसोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. तर दुसरीकडे नियंत्रण सीमेवर पाकिस्तानी सैन्याने कारणाशिवाय गोळीबार सुरु केला आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) सीमारेषेवर मंगळवारी (26 फेब्रुवारी) संध्याकाळी नौशेरा, राजौरी आणि अखनूर सेक्टर येथे सीजफायरचे उल्लंघन केले. एवढेच नसून पाकिस्तान सेनेने मेंढर आणि पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्येही गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पाकिस्तानी रेंजर्संना भारतीय सैन्याकडून प्रतिउत्तर देण्यात येत आहे.

पाकिस्तान स्थित असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या तळावर वायुसेनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरला आहे. तसेच इम्रान खान यांनी भारताला प्रतिउत्तर देणार असल्याची धमकी ही दिली आहे. मात्र पाकिस्तान योग्य वेळी आणि त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी भारतावर हल्ला करणार असल्याचा ही इशारा खान यांनी आज दिला आहे.(हेही वाचा-पाकिस्तान त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी भारताला प्रतिउत्तर देणार- इम्रान खान)

तर पाकिस्तान विदेश मंत्री कुरेशी यांनी असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी भारतीय वायुसेनेने हल्ला केला आहे ते खुले आहे. जगातील लोक हे ठिकाण पाहू शकतात. त्यासाठी आता स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मीडियाला या जागेवर घेऊन जाणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्याचसोबत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पाकिस्तान सैन्याला आणि स्थानिकांना येणाऱ्या परिस्थितीचा सामना करावा असे सांगितले आहे.