बोलान (Suicide Blast in Bolan) येथे झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात बलुचिस्तान कॉन्स्टेब्युलरीचे (Balochistan Constabulary) सुमारे नऊ जवान ठार झाले, तर इतर नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वृत्तसंस्था आयएनएसने याबाबत वृत्त दिले आहे. तर जिओ न्यूजच्या वृत्ताचा दाखला देत आणि कच्छीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मेहमूद नोटझाई यांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, प्राथमिक पुराव्यांवरून हा आत्मघातकी हल्ला असल्याचे दिसून येते आहे. तपास सुरु आहे. संपूर्ण तपासानंतर स्फोटाचे (Suicide Blast) स्वरुप आणि कारण समजू शकेल. दरम्यान, बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहोचले असून स्फोटानंतर परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.
बलुचिस्तानच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये दोन बलुचिस्तान लेव्हीज कर्मचार्यांसह सहा जण ठार झाल्यानंतर काही दिवसांतच हा हल्ला झाला आहे. बलुचिस्तान लेव्हीज फोर्स हे बलुचिस्तान प्रांतातील एक सामुदायिक दल आहे. हे दल प्रांतातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करते आणि प्राथमिक कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींपैकी एक म्हणून ओळखले जाते. बलुचिस्तानच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये लेव्हीज फोर्सचे कार्यक्षेत्र आहे. (हेही वाचा, Blast in Bangladesh: बांग्लादेशात ऑक्सिजन प्रकल्पातील भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू)
ट्विट
At least 9 personnel of the #Balochistan Constabulary were killed while nine others sustained injuries in a suicide blast in #Bolan. pic.twitter.com/HA3gCHeNGB
— IANS (@ians_india) March 6, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट बोलानच्या कांब्री पुलाजवळ झाला असून जखमींना विभागीय मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात येत आहे. पाकिस्तानला तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) कडून हिंसेचा सामना करावा लागत आहे, जो अफगाण तालिबान चळवळीचा एक शाखा आहे जो अफगाण शाखेशी वैचारिकदृष्ट्या संरेखित आहे परंतु त्याचे नेते पाकिस्तानमधून येतात, अशी चर्चा आहे.