बांग्लादेशातील चित्तगांवच्या सीताकुंडा परिसरातील एका ऑक्सिजन प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळावरून 2 किलोमीटरच्या भिंती देखील हादरल्या होत्या. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. (Matheran: प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या माथेरानच्या ई-रिक्षा प्रोजेक्टची मुदत आज संपणार)
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरु असुन काही जखमींची अवस्था गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटामागचे कारण अद्याप समजले नसून अग्निशमन दलाकडून देखील याबाबतची काही माहिती देण्यात आलेली नाही आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या आजुबाजुच्या इमारती देखील हादरल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.