माथेरानमध्ये (Matheran) तीन महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेली ई-रिक्षा प्रकल्पाची (Matheran E-Rickshaw) मुदत आज संपणार असून याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक-पर्यटक तसेच ई-रिक्षा चालक देखील संभ्रमात आहे. माथेरानमध्ये स्वस्त आणि पर्यावरणपूरक ई रिक्षामुळे स्थानिंकाना तसेच पर्यटकांना देखील मोठा दिलासा मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court Of India) निर्देशानुसार माथेरानमध्ये 5 डिसेंबरपासून या सेवेला सुरुवात झाली होती आज या 4 मार्च रोजी या प्रकल्पाला तीन महिने पूर्ण ढाले असून आता ही ई-रिक्षाची (E-Rickshaw) सेवा सुरु राहणार की बंद होणार याबाबत सर्वांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्य सरकारने याबाबत योग्य निर्णय घेऊन या ठिकाणी पुन्हा ई-रिक्षा सुरु ठेवाव्यात अशी पर्यटकांची भूमिका असून या सेवेबद्दल घोडेवाल्यांची नाराजी असल्याचे समोर येत आहे. याबाबत घोडेवाल्यांचा विरोध दुर करण्यासाठी कर्जत माथेरानचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घोडेवाले तसेच स्थानिक नागरिकांसह बैठक घेण्यात आली आहे. (Vande Bharat Train: वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेस मुंबई-गोवा मार्गावर धावणार; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती)
माथेरानमध्ये गेल्या 150 पेक्षा अधिक वर्षांपासून वाहतुकीसाठी हात रिक्षा किंवा घोड्यांचा वापर हा केला जात आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांवर बंदी आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या हातरिक्षा माणसांद्वारे ओढल्या जातात, ही पद्धच अमानवी असून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका सामाजिक संघटनेच्या याचिकेवरुन माथेरानमध्ये ई-रिक्षाच्या चाचणीची परवानगी देण्यात आली होती.