Pakistan Road Accident: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये भीषण रस्ता अपघात, 28 जणांचा मृत्यू, 22 जखमी
Pakistan Road Accident (PC - X/@BalochistanCur1)

Pakistan Road Accident: पाकिस्तान (Pakistan) च्या बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात मोठा रस्ता अपघात (Accident) झाला आहे. येथे एक हायस्पीड प्रवासी बस पलटी होऊन दरीत कोसळल्याने लहान मुले आणि महिलांसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ही बस तुर्बतहून बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टाला जात होती. क्वेट्टापासून 700 किमी अंतरावर असलेल्या वाशुक शहराजवळ बस दरीत कोसळली. वृत्तानुसार, वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बसमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

जिओ न्यूजने बचाव अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, प्रवासी बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बसिमा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मृताच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. (हेही वाचा -Bangladesh Death Toll: रेमल चक्रीवादळामुळे 10 नागरिकांचा मृत्यू, दीड लाख घरांचे नुकसान; सरकारकडून आपत्तीग्रस्तांना अन्नधान्याचा पुरवठा)

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. पाकिस्तानमध्ये रस्ते अपघाताच्या अनेक मोठ्या घटना यापूर्वी समोर आल्या होत्या. यापूर्वी 18 मे रोजी पंजाबमधील खुशाब जिल्ह्यात ट्रक खड्ड्यात पडल्याने एकाच कुटुंबातील 13 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात अन्य 9 जण जखमी झाले आहेत. (हेही वाचा:Cyclone Remal Update: तेलंगणात 'रेमाल' चक्रीवादळाचा प्रभाव, मुसळधार पाऊस आणि वादळात 13 जणांचा मृत्यू)

याशिवाय, 3 मे रोजी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये एक प्रवासी बस अरुंद रस्त्यावरून घसरून दरीत कोसळून किमान 20 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेत 21 जण जखमी झाले होते.