Indonesia Violence After Football Match: इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यानंतर (Indonesia Football Match) हिंसाचार उसळला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 127 लोकांचा मृत्यू झाला. तसेच 100 हून अधिक जण जखमी झाले. न्यूज एजन्सी रॉयटर्सने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पराभूत संघाचे प्रेक्षक संतप्त झाले आणि त्यांनी खेळपट्टीवर हिंसाचाराला सुरुवात केली. पोलिसांनी हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला.
पूर्व जावा येथील मलंग रीजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियमवर इंडोनेशियन लीग BRI लीगा 1 च्या फुटबॉल सामन्यानंतर शनिवारी रात्री ही घटना घडली. इंडोनेशियाचे पूर्व जावा प्रांतातील पोलीस प्रमुख निको अफिन्टा यांनी पत्रकारांना सांगितले की, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यातील सामन्यानंतर पराभूत झालेल्या बाजूच्या समर्थकांनी खेळपट्टीवर हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांना शांत करण्यासाठी अधिकाऱ्यांना अश्रुधुराचा मारा करावा लागला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. गुदमरल्याने अनेकांचा मृत्यूही झाल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Hijab Row in Iran: इराणमध्ये हिजाब वादामुळे वातावरण तापल; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात आणखी 19 जणांचा मृत्यू)
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये मलंगमधील स्टेडियमच्या खेळपट्टीवर लोक धावताना दिसत आहेत. या घटनेत 127 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक लोक जखमी झाले.
For more info of the story:https://t.co/7srPdTbNy9
— ᜊ (@bluetoothwhite) October 2, 2022
फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PSSI) ने एक निवेदन जारी करून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि खेळानंतर काय घडले याचा तपास सुरू करण्यासाठी एक संघ मलंग येथे रवाना झाला आहे. निवेदनात म्हटले आहे की, "पीएसएसआयला कंजुरुहान स्टेडियमवरील अरेमा समर्थकांच्या कृत्याबद्दल खेद वाटतो. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांची आणि या घटनेत सहभागी असलेल्या सर्व पक्षांची दिलगीर आहोत आणि माफी मागतो. यासाठी पीएसआयने तातडीने एक तपास पथक तयार केले असून ते ताबडतोब मलंगला रवाना झाले आहे."
#WATCH | At least 127 people died after violence at a football match in Indonesia, last night. The deaths occurred when angry fans invaded a football pitch after a match in East Java
(Video source: Reuters) pic.twitter.com/j7Bet6f9mE
— ANI (@ANI) October 2, 2022
दंगलीनंतर लीगने एक आठवड्यासाठी खेळ स्थगित केले आहेत. अरेमा एफसी संघावर या हंगामातील उर्वरित स्पर्धेसाठी यजमानपदावरही बंदी घालण्यात आली आहे. लीगचे मालक पीटी LIB चे अध्यक्ष संचालक अखमद हादियन लुकिता म्हणाले, "PSSI च्या अध्यक्षांकडून सूचना मिळाल्यानंतर आम्ही हा निर्णय जाहीर केला. आम्ही सर्वजण या प्रकरणाच्या PSSI कडून चौकशीची वाट पाहत आहोत."