Nelson Mandela's Daughter Zindzi Mandela (Photo Credits: Twitter)

दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या सर्वात छोट्या कन्या झिंडझी मंडेला (Zindzi Mandela ) यांचे निधन झाले आहे. त्या 59 वर्षांच्या होत्या. वृत्तसंस्था आयएनएसने याबाबत वृत्त दिले आहे. झिंडझी मंडेला या दक्षिण अफ्रिकेच्या (South Africa) डेन्मार्क (Denmark ) यथे राजदूत (Ambassador) म्हणून कार्यरत होत्या. पदावर असतानाच त्यांचे निधन झाले.

दरम्यान, झिंडझी मंडेला यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आले नाही. SABC दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या 59 वर्षीय कन्या आणि अविरत सघर्ष करणारे व्यक्तीमत्व Zindzi Mandela यांचे जोहान्सबर्ग येथील एका रुग्णालयात निधन झाले. (हेही वाचा, International Students' Day 2019: आंतराष्ट्रीय विद्यार्थी दिनी स्वामी विवेकानंद ते नेल्सन मंडेला पर्यंत 'या' विचारवंताचे विचार देतील तुम्हाला प्रेरणा)

नेल्सन मंडेला यांना एकूण सहा अपत्ये होती. त्यापैकी Zindzi Mandela या सर्वात शवटच्या सहावे अपत्य होत्या.