International Students' Day 2019: आंतराष्ट्रीय विद्यार्थी दिनी स्वामी विवेकानंद ते नेल्सन मंडेला पर्यंत 'या' विचारवंताचे विचार देतील तुम्हाला प्रेरणा
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन (Photo Credits-File Image)

17 नोव्हेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन पाळला जातो. जागतिक स्तरावर आजवर झालेल्या विद्यार्थी चळवळीच्या घटनांना उजाळा देण्याकरिता मागील 80 वर्षांपासून हा दिवस पाळला जातो.  आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या औचित्यावर अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून तसेच विचारवंतांच्या भाषांचे आयोजन केले जाते, थोडक्यात या दिवशी प्रेरणादायी विचारणाची देवाणघेवाण करून यामार्फत आजवर झालेल्या लढ्यांमधून बलिदान दिलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली दिली जाते तर पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यंना प्रेरणा देण्याची काम केले जाते. आज या दिनाच्या निमित्ताने आम्ही देखील काही विचारवंताचे विचार आपल्यासोबत शेअर करत आहोत..  आपल्या भावी आयुष्यात यातून प्रेरणा घेत आपण नक्कीच खऱ्या आयुष्यात अवलंब कराल अशी आशा.. (आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास आणि कहाणी )

>>स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात तर खरे स्वप्न तेअसतात जे तुम्हाला पूर्ण केल्या शिवाय झोपुच देत नाहीत

-अब्दुल कलाम

>शील, करुणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर

प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

>विद्येविनी मती गेली

मतीविना नीती गेली

नीतीविना गती गेली

गतीविना वित्त गेले

वित्तविना शुद्र खचले

इतके अनर्थ एका अविद्येने केले

-महात्मा ज्योतिबा फुले

>उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच लक्ष्य प्राप्त करत नाही तो पर्यंत थांबू नका

-स्वामी विवेकानंद

>शिक्षणाशिवाय तुमची मुले कधीही त्यांना येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊ शकणार नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण देणे आणि त्यांनी त्यांच्या देशासाठी भुमिका बजावावी हे स्पष्ट करणे फार महत्वाचे आहे.

-नेल्सन मंडेला

17 नोव्हेंबर या दिवशी चेकोस्लोवाकिया देशाची (Czechoslovakia) राजधानी प्राग येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नाझी पार्टीकडून गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडन येथे असलेल्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आदरांजली देत हा दिवस पाळला जातो.