
प्रेमी प्रेमात काय करत नाहीत? ते चंद्र-तारे तोडण्याचा दावा करतात, स्वप्नांचा महाल बांधण्याची आश्वासने देतात. एवढेच नाही तर काही लोक प्रेमामध्ये असे काही करतात, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. प्रेमात असे वेडे झालेले अनेक लोक आपण पाहिले असतील. आता इजिप्तमधून (Egypt) प्रेमाबाबत असेच एक प्रकरण समोर आले आहे. इजिप्तच्या मेनौफिया (Menoufia) प्रांतात 21 वर्षीय मुलाची गर्लफ्रेंड परीक्षेमध्ये नापास झाल्याने, संतापात या मुलाने चक्क शाळाच पेटवून दिली.
सुदैवाने मुलाने उचललेल्या या पावलामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. सध्या हा मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे. रिपोर्टनुसार, या मुलाची गर्लफ्रेंड मेनोफिया प्रांतात शिकत होती. दोघांची एंगेजमेंट झाली होती आणि काही काळानंतर ते लग्न करणार होते. दरम्यान, ही मुलगी परीक्षेत नापास झाली. निकाल कळल्यावर मुलगा घाबरला कारण त्याला भीती होती की, आता प्रेयसीला त्याच वर्गात शिकावे लागणार आणि त्यामुळे आपले लग्न पुढे ढकलले जाणार.
याच रागातून त्याने शाळेलाच आग लावली. आगीमुळे शाळेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. अनेक कागदपत्रे जळाली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी गुन्हा केल्यानंतर मुलगा पळून गेला आणि एका गावात लपून बसला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (हेही वाचा: Pakistan Flood: पाकिस्तानात पाऊस आणि पुरामुळे हाहाकार, जवळजवळ 1000 जणांचा मृत्यू; देशात आणीबाणी जाहीर (Watch Video)
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर चौकशीत मुलाने हे सत्य उघड केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण कोर्टात पोहोचेपर्यंत हा मुलगा पोलिस कोठडीत राहणार आहे. दरम्यान, याआधी इजिप्शियन चर्चला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला होता. इजिप्तच्या कॉप्टिक चर्चने सांगितले की, कैरो येथील चर्चला आग लागल्याने किमान 41 लोक ठार झाले, तर 14 जण जखमी झाले.