UAE Flag. (Photo Credits: Twitter)

भारतीय इतिहासातील हिंदू सोडून इतर धर्मिय राजांनी उभारलेल्या वास्तू, शहरं, प्रदेश आदिंची नावे बदलून ती पूर्णपणे हिंदू संस्कृतीशी संबंधित ठेवण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे. अशा वेळी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथून मात्र वेगळे वृत्त येत आहे. UAE चे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum) यांनी अल मिन्हाद जिल्ह्याचे (Al Minhad District) आणि त्याच्या आसपासच्या भागाचे नाव बदलून 'हिंद शहर' (Hind City) असे केल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा त्यांनी रविवारी केल्याचे वृत्त वृत्तसंस्था एएनआयने डब्ल्यूएएमने च्या हवाल्याने दिले आहे.

शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम ज्यांनी अल मिन्हाद जिल्ह्याचे 'हिंद शहर' असे नामकरण केले ते संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तसेच दुबईचे शासक आहेत. यूएईचे माजी उपाध्यक्ष आणि दुबईचे शासक शेख रशीद बिन सईद अल मकतूम यांचा तो तिसरा मुलगा आहे. 2006 मध्ये त्याचा भाऊ मकतूमच्या मृत्यूनंतर, मोहम्मदने उपाध्यक्ष आणि शासक म्हणून पदभार स्वीकारला. (हेही वाचा, World's Safest City: डेन्मार्कचे Copenhagen ठरले जगातील सर्वात सुरक्षित शहर; जाणून घ्या दिल्ली व मुंबईचे स्थान (See Top 10 List))

अल मिन्हाद जिल्हा, नव्या नामकरणानुसार 'हिंद शहर' चार झोनमध्ये विभागले गेले आहे आणि त्यात UAE रहिवाशांसाठी घरे आहेत. हिंद 1, हिंद 2, हिंद 3 आणि हिंद 4 असे हे विभाग आहेत. हे शहर एकूण 83.9 किमी क्षेत्रफळावर पसरले आहे. हे शहर एमिरेट्स रोड, दुबई-अल ऐन रोड आणि जेबेल अली-लेहबाब रोड यांसारख्या प्रमुख मार्गांनी जोडलेले आहे. WAM ने याबाबत अहवाल दिला आहे.

अल मिन्हाद प्रदेशाचे नामकरण 'हिंद शहर' असे करताना दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम म्हणाले की, दुबईमध्ये एखाद्या शहराचे नाव बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2010 मध्ये, बुर्ज दुबईचे नाव बदलून बुर्ज खलिफा असे करण्यात आले होते, शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक होते. 13 मे 2022 रोजी त्यांचे निधन झाले.