सर्वसामान्यपणे भारत देशातील अनेक शहरे सुरक्षित नाहीत अशी धारणा परदेशी लोकांची असते. आता एका नव्या अभ्यासामध्येही असेच काहीसे चित्र दिसत आहे. द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन (Copenhagen) हे जगातील सर्वात सुरक्षित शहर (World's Safest City) आहे. या यादीत टोरंटो दुसऱ्या आणि सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये जगातील 60 सुरक्षित शहरांना स्थान देण्यात आले आहे, ज्यात भारताची राजधानी नवी दिल्ली 48 व्या क्रमांकावर आहे आणि मुंबई शहर 50 व्या क्रमांकावर आहे.
जगातील सुरक्षित शहरांची यादी तयार करण्यासाठी, EIU ने 76 पॅरामीटर्सवर आधारित 60 शहरांची रँकिंग केली आहे. या पॅरामीटर्समध्ये डिजिटल, आरोग्य, पायाभूत सुविधा, वैयक्तिक आणि पर्यावरण सुरक्षा यांचा समावेश आहे. या पाच मापदंडांमध्ये सर्व शहरांना वेगवेगळे गुण देण्यात आले आहेत. सर्व शहरांना 100 पैकी गुण देण्यात आले आहेत.
या यादीनुसार ही शहरे जगातील 60 राहण्यायोग्य शहरांमध्ये पहिली 10 आहेत-
कोपनहेगन
टोरंटो
सिंगापूर
सिडनी
टोकियो
आम्सटरडॅम
वेलिंग्टन
हाँगकाँग
मेलबर्न
स्टॉकहोम
भारतातील दोन शहरांनाही या यादीत स्थान मिळाले आहे, ज्यात राजधानी दिल्ली 48 व्या क्रमांकावर आणि 50 व्या क्रमांकावर मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर मानले गेले आहे. पाकिस्तानच्या कराची शहरालाही या यादीत स्थान मिळाले आहे. पहिल्या 60 सुरक्षित शहरांच्या यादीत कराची 59 व्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: 18 वर्षीय मतिमंद मुलीवर शहाजानपुर मध्ये बलात्कार, FIR दाखल)
डिजिटल सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली 48 आणि मुंबई 53 व्या क्रमांकावर आहे. आरोग्य सुरक्षेच्या बाबतील दिल्ली 40 तर मुंबई 44 व्या क्रमांकावर आहे. वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतील दिल्ली 41 व मुंबई 50 व्या क्रमांकावर आहे.