Uttar Pradesh Shocker: 18 वर्षीय मतिमंद मुलीवर शहाजानपुर मध्ये बलात्कार, FIR दाखल
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

Uttar Pradesh Shocker:  शहाजानपूर मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानुसार एका 40 वर्षीय व्यक्तीने 18 वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलीचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ही जिल्ह्यातील तिहार परिसरात घडली असून जेव्हा पीडिता आपल्या गुरांना घेऊन चरण्यासाठी गेली होती.(Bihar: मुलगा, मुलगी आणि सुनेकडून वडिलांची हत्या, घरातच पुरला मृतदेह)

टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या बातमीनुसार, आरोपीने मुलीला साखरेच्या पोत्यात भरले आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडिता जेव्हा घरी परतली तेव्हा तिने तो प्रकार आईला सांगितला. आईने या घटनेबद्दल अधिक माहिती दिली आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच रात्री मुलीच्या घरातल्यांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करुन घ्यावी असे म्हटले. सदर आरोपी हा त्यांच्याच गावातील असून त्याचे लग्न सुद्धा झाले आहे.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, ती मतिमंद असल्याने तिला शाळेत पाठवणे सुद्धा बंद केले होते. या प्रकरणी एसएचओ संजय सिंग यांनी असे म्हटले की, या घटनेबद्दल कळताच तातडीने त्यांनी गावात धाव घेतली. घटनास्थळी काही पुरावे मिळतात का ते सुद्धा पाहिले.

मात्र आरोपीचा शोध लागला नसून तो त्यांच्या जातीमधीलच एक असल्याचे सांगितले जात आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार कलम 376 नुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचसोबत या प्रकरणी अधिक तपास केला जात असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.