Bihar: मुलगा, मुलगी आणि सुनेकडून वडिलांची हत्या, घरातच पुरला मृतदेह
Representational Image (Photo Credits: Facebook)

Bihar:  बिहार मधील पुर्णिया जिल्ह्यातील कस्बा थानाच्या मथौर गावात नात्याला कंलक लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वत:चा मुलगा, मुलगी आणि सुनेने मिळून आपल्याच वडिलांची गळा दाबून हत्या केली आहे. ऐवढेच नव्हे तर मृतदेह हा घरातच पुरला. तर 9 दिवसानंतर शनिवारी पोलिसांनी मजिस्ट्रेटच्या निगराणीखाली घर खोदून शव बाहेर काढले. पोलिसांनी मुलगा, मुलगी आणि सुनेला अटक केली आहे.(Bihar: प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी प्रेयसीचा अजब प्रकार, स्वत:वर केला अॅसिड हल्ला)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 10 गुंठे जमिनीवरुन मुलगा, मुलगी आणि सुनेने मिळून नईमुद्दीन यांची हत्या केली. मृत नईमुद्दीन यांची दुसरी पत्नी इशरत खातून यांनी असे म्हटले की, त्यांनी दोन लग्न केली होती. नईमुद्दीन यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा मुजस्सिम आणि वसीम दोघांच्या पत्नी नर्गिस खातून, आशिया खातून आणि मुलगी नासरी खातून यांनी मिळून नईमुद्दीन यांची हत्या केली. त्याचसोबत शव जाळल्यानंतर घरातच पुरले. नईमुद्दीन यांचे चुलते नियामुद्दीन यांनी असे म्हटले की, जमीनिवरुन गावात पंचायत सुद्धा बोलावण्यात आली होती.

नईमुद्दीन आपली दुसरी बायको हिच्या मुलाच्या नावावर 10 गुंठे जमीन करणार होता. याच कारणामुळे नईमुद्दीन याच्या पहिल्या बायकोचा मुलगा, मुलगी आणि सून यांनी मिळून त्याची हत्या करत त्याचा मृतदेह लपवला. गेल्या शुक्रवारी नईमुद्दीन याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.(मंगळुरु मधील दांपत्याची COVID19 च्या भीतीमुळे आत्महत्या, शवविच्छेदन दरम्यान चाचणी आली निगेटिव्ह)

मथौरचे सरपंच पति नसीम अख्तर यांनी असे म्हटले की, जमिनीवरुन सावत्र भाऊ-बहिणींमध्ये नेहमीच वाद व्हायचा. याच कारणामुळे पंचायत सुद्धा बोलावण्यात आली होती. पंचायत मध्ये सर्व गोष्टींचा निर्णय झाला होता. मात्र नंतर असे कळले की, नईमुद्दीन गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत. आता कळले की, त्यांचा मुलगा, मुलगी आणि सून यांनी मिळून त्यांची हत्या करत त्यांना पुरले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या संबंधित कस्बाचे थाना प्रभारी अमित कुमार यांनी म्हटले की, वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.