Bihar: घरातल्यांनी आपले लग्न प्रियकरासोबत लग्न लावून देण्यासाठी तरुणासह तरुणीने एक अजब प्रकार घडवून आणला आहे. प्रेमिकाने स्वत:वर अॅसिड हल्ला (Acid Attack) केला. ज्यामुळे तरुणीच्या घरातील मंडळी तिचे लग्न प्रियकरासोबत लावून देतील. ही घटना बिहार मधील नालंदा येथील आहे. नालंदा येथील लहेरी थाना क्षेत्रातील परिसराजवळ सकाळच्या वेळेस एका तरुणीवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी 48 तासांच्या आतमध्येच या प्रकरणाचा खुलासा करत 5 जणांना अटक केली आहे.(Woman Set on Fire in Mahoba: विनयभंगाच्या तक्रार केली म्हणून महिलेला जिवंत पेटवून दिले, उपचारादरम्यान पीडिताचा मृत्यू)
डीसीपी डॉ. शिब्ली नोमानी यांनी असे म्हटले की, तरुणीचे साजन कुमार नावाच्या एका तरुणासोबत गेल्या 7 वर्षापासून रिलेशनशिप सुरु होते. परंतु तरुणीच्या घरातील मंडळींनी या दोघांच्या लग्नाला नकार दिला होता. याच कारणामुळे तरुणी आणि तरुणाने मिळून निर्णय घेतला की, जर अॅसिड हल्ला करुन शरिराचा काही भाग जाळला तर मुलीच्या घरातील मंडळी लग्नासाठी तयार होतील. त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी साजनने आपल्या तीन चुलत भावांसह 4 तरुणांना पटना येथील आलगंज येथून बोलावले आणि हा प्रकार घडवून आणला. घटनेच्या दिवशी साजव स्वत: तरुणीसोबत फिरत होता.(मंगळुरु मधील दांपत्याची COVID19 च्या भीतीमुळे आत्महत्या, शवविच्छेदन दरम्यान चाचणी आली निगेटिव्ह)
आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले की, तरुणीसह तो एका ठिकाणी जात आहे. याच दरम्यान दोन तरुण विरुद्ध दिशेने येत तरुणीवर अॅसिड हल्ला करत पळून जातात. यापूर्वी तरुण आणि तरुणाने 2017 मध्ये घरातून पळ काढला होता. मात्र दबावानंतर पुन्हा घरी परतले होते. तर या प्रकरणी आता आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.