Woman Set on Fire in Mahoba: विनयभंगाच्या तक्रार केली म्हणून महिलेला जिवंत पेटवून दिले, उपचारादरम्यान पीडिताचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Woman Set on Fire in UP:  देशात महिला अत्याचार संबंधित विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) महोबा (Mahoba) येथून सर्वांना हादरून टाकणारी घटन उघडकीस आली आहे. या परिसरात एका व्यक्तीविरोधात विनयभंगाची तक्रार करणे 30 वर्षीय महिलेला महागात पडले आहे. पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीच्या पालकांनी फिर्यादी मुलीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही या घटनेत पीडित अधिक गंभीर स्वरुपात भाजल्याने तिला झांसी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज अखेर उपचारादरम्यान पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीच्या आईला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मृत महिलाने मजिस्ट्रेटला रविवारी दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, तिने शेजारी राहणाऱ्या एका आरोपी विरुद्ध मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पीडिताच्या तक्रारीनंतर आरोपी पोलिसांनी अटक केली होती. यामुळे आरोपीचे आई-वडील नाराज होते. हे देखील वाचा- UP: माजी सैनिकाने 14 दिवस मुलाचा मृतदेह ठेवला डीप फ्रिजरमध्ये, समोर आले 'हे' कारण

कुलपहाड ठाण्याचे एसअसचओ महेंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने आपल्या मुलाविरोधात पोलिसात दिलेल्या तक्रारीमुळे संतप्त झाले. याच रागातून आरोपीच्या आई-वडिलांनी पीडित मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या आईला अटक केली आहे. तर, आरोपीचे वडील फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.