
UP: उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर मध्ये एका वडिलांनी आपल्या मुलाचा मृतदेह जवळजवळ 14 दिवस डीप फ्रिजमध्ये ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी असे म्हटले की, माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठावले पण काही फायदा झाला नाही.याच कारणामुळे मुलाचा मृतदेह डीप फ्रिजमध्ये ठेवला होता. पण आता त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.(Bihar Triple Murder: खळबळजनक! एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या, जावयावर खुनाचा संशय; पोलीस तपास सुरू)
सरैया माझौवा गावातील हे प्रकरण आहे. शिवप्रसाद पाठक सेनेचे सुबेदार होते. निवृत्त झाल्यानंतर गावात आले होते. शिवप्रसाद पाठक यांच्या परिवारात पत्नीसह दोन मुले शिवांक, इशांक आणि दोन मुली सुनीता आणि पुनम आहे. दोन्ही मुलींची लग्न वडिलांनी लावून दिली आहेत. तर मोठा मुलगा शिवांक हा दिल्लीत 2012 मध्ये एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होता. याच दरम्यान शिवांकने दिल्लीत 24 एप्रिल 2012 रोजी एका व्यक्तीसह मिळून टॅक्सीगो नावाची कंपनी सुरु होती. कंपनीच्या पार्टनरने दिल्लीतच राहणाऱ्या गुरलीन कौर या तरुणीला एचआरच्या पदासाठी नियुक्त केले.
असे सांगितले जात आहे की, शिवांक याने याच तरुणीसोबत 2013 मध्ये लग्न केले होते. आरोप असा आहे की, शिवांकच्या नावावर भरपूर संपत्ती होती. याच संपत्तीवर तरुणीचा डोळा होता. याच दरम्यान 1 ऑगस्ट 2021 रोजी दिल्लीत शिवांक याचा संशयास्पद मृत्यू झाला. तर या मृत्यूला शिवांक याच्या वडिलांनी एक हत्या असल्याचे म्हटले आहे.(Bihar: मुलं सतत रडतं म्हणून आईचा अजब प्रकार, बाळाच्या ओठांना फेविक्विक लावून चिटकवले ओठ)
शिवप्रताप पाठक यांनी असे म्हटले आहे की, मुलाची हत्या झाल्याप्रकरणी तपास करण्यासाचे आदेश एसएचओ बेगमपुरा दिल्ली यांना दिली होती. मात्र पोलिसांनी गुन्हाच दाखल केला नाही. ऐवढेच नव्हे तर मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांना शिवांक याचा मृतदेह दिला गेला. त्यानंतर शिवांक याचा मृतदेह घेऊन परिवारातले गावात परतले. तर मुलाच्या हत्येचा शोध लागावा यासाठी वडिलांनी कुरेभार थाने पोलिसांना याची सुचना दिली.
पाठक यांनी असा आरोप लावला आहे की, त्यांचे कोणीही ऐकले नाही. याच कारणामुळे त्यांनी आपल्या मुलाचा मृतदेह ठेवण्यासाठी एक डीप फ्रिजर खरेदी केला आणि त्यात त्याला ठेवले. तर 3-9 ऑगस्टच्या दरम्यान त्याचे वडिल एसपी, डीएम पर्यंतच्या सर्वांना भेटून शवविच्छेदन आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते. या प्रकरणी सुल्तानपूरचे पोलीस अधिक्षक विपिन कुमार मिश्रा यांनी असे म्हटले की, या घटनेचा कोणताही क्रम नाही आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेश आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.