SCO शिखर परिषद 15 आणि 16 सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानच्या (Uzbekistan) समरकंद (Samarkand) येथे पार पडणार आहे. या परिषदेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), चीनचे (China) राष्ट्रपती जिनपिंग (Xi Jinping) आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) एकाच व्यासपीठावर दिसतील. तर, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) प्रथमच SCO शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. आंतराष्ट्रीय पातळीवर होणारी ही SCO शिखर परिषद भारताच्या दुष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या परिषदेत संघटनेची क्षमता आणि अधिकार वाढवणे, प्रदेशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करणे, गरिबी कमी करणे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे या प्रयत्नांचा समावेश आहे. शिवाय, त्यांनी आंतरप्रादेशिक व्यापाराच्या विकासासाठी योजना तयार करणे, तांत्रिक नियमांचे संरेखन करणे आणि सीमाशुल्क प्रक्रियांचे डिजिटलीकरण करणे या विशेष बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) पहिल्यांदाचं एका छताखाली येणार आहेत. अशा स्थितीत दोन्ही नेत्यांमध्ये भेट होते का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.तसेच चीनचे राष्ट्रपती जिंगपींग (Xi Jinping) देखील या परिषदेस उपस्थित असणार आहेत.गलवान खोऱ्यावरून (Galwan Valley) भारत-चीन संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावादरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे (China) राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक देखील होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हे ही वाचा:- Vladimir Putin यांचा उजवा हात Aleksandr Dugin यांची कन्या Daria Dugina कार अपघातात मृत्यू, मॉस्को येथील घटना)
तसेच पुतिन (Vladimir Putin) आणि जिनपिंग (Xi Jinping) यांच्या या भेटीवर अमेरिकेतूनही (America) तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. एकीकडे युक्रेनवरील (Ukraine) लष्करी हल्ल्यामुळे रशिया अमेरिकेसमोर उभा ठाकला आहे, तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही तैवानवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या (Russia) अध्यक्षांची भेट घेऊन अमेरिकेला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.