Daria Dugina | (Photo Credit - ANI/Twitter)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे जवळचे सहकारी अलेक्झांडर डुगिन (Aleksander Dugin) यांची मुलगी डारिया डुगिना (Daria Dugina) हिचा मॉस्कोमध्ये कार स्फोटात मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मॉस्को (Moscow ) प्रांतातील ओडिन्सोव्स्की जिल्ह्यात ( Odintsovsky District) एका कारला आग लागली. ज्यामध्ये डारिया डुगिना होती. अलेक्झांडर डुगिन हे व्लादिमीर पुिन यांचे ब्रेन म्हणूनही ओळखले जातात. ते एक तत्वज्ञांनी आणि रशियातील प्रभावी राजकारणीही आहेत. दावा केला जात आहे की, हे स्फोट अलेक्झांडर यांच्यासाठी घडवून आणले होते. मात्र, त्यात त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.

दारियाच्या कारमध्ये मॉस्को प्रांतात ओदिनसोस्की डिस्ट्रिक्ट मध्ये आग लागली होती. अलेक्झांडर हे एक रशियन तत्वज्ञ आणि राजकीय विश्लेषक आहेत. अपघाताची माहिती कळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रसारमाध्यमांमध्ये जारी झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळते की, हल्ला पाहून ते जागीच स्तब्ध झाले. महत्त्वाचे म्हणजे दुगिन यांच्यावर यूरेपीय यूनियन, अमेरिका आणि कॅनडा या देशांनी या आधीच प्रतिबंध लावले आहेत. (हेही वाचा, Somalia Terrorist Attack: अल-शबाब संघटनेकडून सोमालियात दहशतवादी हल्ला, 8 जण ठार; अनेकांना मुंबईतील 26/11 ची आठवण)

पुतिन यांच्या सर्व खेळ्यांचे मास्टरमाईंड अशी ओळक असलेल्या अलेक्जेंडर यांची युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी राहिली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सांगितले जाते आहे की, क्रीमिया आणि यूक्रेन यांच्यात झालेल्या सैन्य करवाईमागेही त्यांचा हात होता.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 30 वर्षीय दारिया एक कार्यक्रम आटोपून घरी परतत होती. रस्त्यात त्यांची टोयोटा लँड क्रूजर कार हल्ल्याची शिकार झाली. सांगितले जात आहे की, या कारमधून अलेक्झांडर प्रवास करणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी तो निर्णय बदलला. सांगितले जात आहे की, ते आपल्या मुलीच्या कारपाठीमागूनच प्रवास करत होते. त्यांच्या मुलीसोबत घडलेली घटना त्यांनी पाहिली आहे.