सौदी अरेबिया: महिलांची तारिफ किंवा कॉफी-डिनरसाठी विचारल्यास पडणार महागात, होईल थेट तुरुंगात रवानगी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

महिलांच्या सौंदर्याबाबत तारिफ करणे किंवा त्यांना कॉफी-डिनरसाठी विचारल्यास आता अरब देशात पुरुषांना महागात पडणार आहे. येथे महिलांशी फ्लर् करणे किंवा त्यांची तारिफ करणे ही गोष्ट तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते. खलीज टाईम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कंपनीतील एखादा कर्मचारी किंवा अधिकारी गरजेपेक्षा महिलेचे तारिफ केल्यास किंवा डिनरसाठी विचारल्यास ते महागात पडू शकते. अरबच्या नव्या कायद्यानुसार, फ्लर्ट करणे अपराध असल्याने तुरुंगाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

रिपोर्टनुसार, महिलांचा उपहास किंवा त्यांच्या प्रती त्यांच्या सन्माला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करणे हे अरब संस्कृतिच्या विरोधात आहे. 1987 मध्ये केंद्रीय कायद्यानुसार महिलांना अपमानजनक शब्द बोलणे किंवा व्यावहारिक पद्धतीने दुखावल्यास ते गुन्हात मोडते. ऐवढेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही महिलेला अपमानकारक मेसेज किंवा पोस्ट करणे तुम्हाला धोक्यात पाडू शकते. अरब पीनल कोड 359 अंतर्गत आरोपी व्यक्तिला एका वर्षासाठी तुरुंगवास किंवा 10 हजार दिरहामचा दंड देणे अनिवार्य असणार आहे. तसेच महिलांसोबत गैरवर्तवणूक करणारा विदेशी नागरिक असल्यास त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला देशातून काढले जाणार आहे.('या' शहरात कुत्रा झाला महापौर; दिमाखदार पद्धतीत पार पडला शपथविधी सोहळा (Watch Video)

दरम्यान, महिलांचा सन्मान लक्षात घेता जगभरातील सर्व देशात कठोर कायदे आहेत. आजच्या काळात या नियमात थोडेफार बदल करण्यात आले आहेत. सौदी अरेबियात महिलांना ड्राइव्ह करणे, खेळात भाग घेणे किंवा नोकरी करण्याची सुद्धा परवानगी नाही आहे. आशातच आता नव्या कायद्यांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.