Sao Paulo Plane Crash: ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात शुक्रवारी एक मोठी दुर्घटना(Brazil Plane Crash) घडली. 62 प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानात अचानक हवेत बिघाड झाला. त्यानंतर हवेतच घिरट्या मारत हे विमान जमिनीवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील सर्व 62 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या विमान दुर्घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ब्राझीलच्या (Brazil) स्थानिक वृत्तवाहिन्यांनी त्याबाबतची माहिती दिली. सध्या तेथे मृतांना बाहेर काढण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.(हेही वाचा:Plane Crashes in Brazil’s Sao Paulo: ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये भीषण अपघात; 62 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले (Watch Video) )
मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त विमान हे व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचं होतं. या विमानातून 58 प्रवासी आणि 4 विमान कर्मचारी प्रवासी प्रवास करीत होते. प्रवाशांना घेऊन हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं. विमानाने उड्डाण भरल्यानंतर अचानक विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर वैमानिकाचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला. (हेही वाचा:Japan Megaquake: जपान च्या वेधशाळे कडून 'महाकाय भूकंपाचा' अलर्ट जारी; 8-9 रिश्टल स्केलच्या भूकंपाचा अंदाज वर्तवत नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला )
पोस्ट पहा
🚨🇧🇷Major plane crash in Brazil!
Expected dead 58 Passengers and 4 crew!
Plane exploded near houses but no people damaged yet on the ground hopefully.
More updates to come! pic.twitter.com/tgX4MS29ig
— James Rizk (@JamesRizk1) August 9, 2024
काही क्षणातच विमानाने हवेत घिरट्या (Plane Crash) मारण्यास सुरुवात केली. वैमानिकाने विमानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं. अखेर 62 प्रवाशांसह उंच आकाशातून विमान थेट जमिनीवर कोसळलं. विमान कोसळल्यानंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाज झाला आणि आजूबाजूचा परिसर हादरला. या विमान अपघाताचा थरार काहींनी मोबाइलमध्ये कैद केला.