Plane Crashes in Brazil’s Sao Paulo: ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये भीषण अपघात; 62 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले (Watch Video)

या घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या विमानात 62 लोक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये विमान वेगाने खाली जाताना दिसत आहे.

Plane Crashes in Brazil’s Sao Paulo: ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये भीषण अपघात; 62 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले (Watch Video)
Plane Crash in Brazil’s Sao Paulo

Plane Crash in Brazil’s Sao Paulo: ब्राझीलमधील साओ पाउलो येथे एक मोठा विमान अपघात झाला आहे. साओ पाउलो राज्यात एक प्रवासी विमान कोसळले आहे. या घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या विमानात 62 लोक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये विमान वेगाने खाली जाताना दिसत आहे. अपघातानंतर ताबडतोब मदत बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्राझीलच्या प्रादेशिक एअरलाइन VoePass चे विमान 2283-PS-VPB शहराच्या निवासी भागात शुक्रवारी क्रॅश झाले. हे विमान साओ पाउलोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ ग्वारुलहोसकडे जात होप्ते. अपघात कशामुळे झाला हे निवेदनात सांगण्यात आलेले नाही. अग्निशमन दलाने विमान विन्हेडो शहरात पडल्याची पुष्टी केली. (हेही वाचा; Earthquake in Japan: टोकियो आणि आसपासच्या भागात 5.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2024 11:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).