Brazil X Ban: एलोन मस्क यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एक्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांड्रे डी मोरेस आणि एलोन मस्क यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म एक्सवर बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवायचा की नाही यावर आज ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात मतदान झाले. आता या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती मोरेस यांचा निर्णय कायम ठेवण्यासाठी मतदान केले आहे. म्हणजेच ब्राझीलमध्ये एक्सवर बंदी कायम राहणार आहे. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता आणि मालकाला $8,900 च्या दंडाचे आदेशही देण्यात आले आहेत. (हेही वाचा: Jio Finance App in Paris: पॅरिसमध्ये लाँच झाले जिओ फायनान्स ॲप; फ्रेंच राजधानीतील निवडक पर्यटन स्थळांवर करू शकणार व्यवहार)
ब्राझीलमध्ये 'एक्स'वर बंदी घालण्याचे आदेश कायम-
BREAKING: Brazil's Supreme Court votes to uphold Justice Moraes' decision to ban Twitter/X - Reuters
— BNO News (@BNONews) September 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)