Jio Finance App Debuts in Paris: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडने मंगळवारी पॅरिसमध्ये त्यांचे जिओ फायनान्स ॲप लाँच केले. कंपनीने या ॲपच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची घोषणा केली. हे ॲप आता फ्रान्सच्या राजधानीतील निवडक ठिकाणी व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते. सध्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरु आहे. अशात नवीन जिओ फायनान्स ॲप जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. पॅरिसला भेट देणारे भारतीय प्रवाशी निवडक पर्यटन स्थळांवर अनेक गोष्टींसाठी जिओ फायनान्स ॲप वापरू शकतात. पॅरिसमध्ये भारतीय पर्यटकांना डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्यास सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे. जिओ फायनान्स ॲप सर्वसमावेशक डिजिटल आर्थिक अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. या ॲपच्या प्रमुख फीचर्समध्ये युपीआय पेमेंट, डिजिटल बँक खाते, वॉलेट सेवा, बिल पेमेंट आणि रिचार्ज, रिवॉर्ड्स, विमा ब्रोकिंग आणि इतर समाविष्ट आहेत. (हेही वाचा: Security Alert For Apple Users: केंद्राने भारतातील ॲपल iPhone, iPad, MacBook वापरकर्त्यांसाठी जारी केला अलर्ट; सायबर हल्ल्याचा धोका)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)