Navdeep Singh Meets Prime Minister Narendra Modi: पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारतीय पॅरा ॲथलीट नवदीप सिंगने (Navdeep Singh) भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकून देशाला गौरव मिळवून दिले. 23 वर्षीय नवदीप सिंगने पॅरालिम्पिक खेळांच्या भालाफेक स्पर्धेत भारतासाठी प्रथमच सुवर्णपदक जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली आणि कोणत्याही पॅरालिम्पिक स्पर्धेत हे त्याचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. नवदीपने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्येही भाग घेतला होता, परंतु या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो चौथ्या स्थानावर राहिला. नवदीप सिंगच्या या कामगिरीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांची भेट घेतली. पीएम मोदी आणि नवदीप सिंह यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूपच मजेदार आहे.
नवदीप सिंगसाठी जमिनीवर बसलेले पंतप्रधान मोदी
#WATCH | Gold medal-winning javelin para-thrower Navdeep Singh gifts a cap to Prime Minister Narendra Modi and takes his autograph, during their meeting.
(Source: PM Narendra Modi's Instagram handle) pic.twitter.com/qKGNEdEwqv
— ANI (@ANI) September 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)