Brazil Bus Crash: ब्राझीलच्या अलागोआस राज्यात बस दरीत कोसळल्याची दुर्घटना(Brazil Bus Crash) घडली. या दुर्घटनेमुळे 17 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या अपघाची माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. ती बस उनियाओ डोस पाल्मारेस नगरपालिकेच्या डोंगराळ भागात दरीत कोसळली. ब्राझीलच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने त्याबाबतची माहिती दिली. राज्य सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे वचन दिले. देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. (Israeli-Lebanon War: लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात मोठी जिवीतहानी, बेरूत हल्ल्यात 29 ठार)
ब्राझीलमध्ये बस दरीत कोसळली
Tragédia | Ônibus capota em ribanceira na Serra da Barriga, Alagoas e deixa 23 mortos; veja VÍDEO pic.twitter.com/GOKClvirtJ
— Aldo Almeida ألميدا 🇦🇪 (@AldoAlmeida013) November 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)