Israeli-Lebanon War: लेबनॉनमध्ये इस्त्रायने पुन्हा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले. मध्य बेरूतच्या दाट लोकवस्तीतील एका उंच निवासी इमारतीवर हा हल्ला झाला. या हल्ल्यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. बेरूतच्या दाहेहमध्ये इस्त्रायली हवाई दलाने 12 हिजबुल्लाह कमांड सेंटर्सवर हल्ला केला, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी मृतांची संख्या 20 नोंदवली होती. नंतर ती वाढत गेली. आता ती 29 वर पोहचली आहे.
इस्रायलने युद्धविराम प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना न जुमानता हिजबुल्लाह विरुद्ध आपली आक्रमक लष्करी मोहीम सुरू ठेवली आहे. आयडीएफने पुष्टी केली की त्यांच्या हल्ल्यांनी बेरूतच्या दक्षिणी उपनगरातील हिजबुल्लाच्या स्थानांना लक्ष्य केले. (Rare Face Transplant After Suicide Attempt: मिशिगन येथील आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या माणसावर चेहरा प्रत्यारोपण; दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी)
इस्त्रायली सैन्याने नागरी नुकसान कमी करण्यासाठी परिसरातील अनेक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश जारी केले. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, बस्तामधील हल्ल्यामुळे मध्य बेरूतवर इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्या हल्ल्यात 13 जण जखमी झाले, तर जवळपासच्या शहरांमध्ये झालेल्या अतिरिक्त हवाई हल्ल्यात किमान 11 लोक मारले गेले आणि 32 जण जखमी झाले.
दक्षिण लेबनॉनमधील टायर शहरालाही लक्ष्य करण्यात आले होते. इस्त्रायली बॉम्बहल्ल्यात पाच जण ठार झाले आणि 19 जण जखमी झाले. सप्टेंबरपासून, इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये अनेक हिजबुल्ला कमांडर मारले गेले आहेत आणि मुख्य पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे, ज्यामुळे दक्षिण लेबनॉनमध्ये व्यापक विनाश झाला आहे. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, लेबनॉनमध्ये संघर्षाने खूप मोठा टोल घेतला आहे, 3,000 हून अधिक लोक मारले गेले आणि 10 लाखांहून अधिक विस्थापित झाले.