Earthquake in Japan: शुक्रवारी टोकियो (Tokyo) जवळील भागात 5.3 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. एजन्सीनुसार, पश्चिम कानागावा प्रीफेक्चरमध्ये हा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची खोली भूगर्भात 10 किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी दक्षिण-पश्चिम जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भुकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर आज पुन्हा टोकियोजवळील भागात 5.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपासोबतच जपानमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, सध्या देशात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. जपानी अधिकाऱ्यांनी क्युशू आणि शिकोकू या पश्चिम बेटांच्या पॅसिफिक किनारपट्टीवर एक मीटर उंचीपर्यंत सुनामीच्या लाटांचा इशारा दिला आहे. गुरुवारी झालेल्या भूकंपानंतर क्युशूच्या मियाझाकी प्रांतात 20 सेमी उंच लाटा उसळताना दिसल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)