
युक्रेनसोबत (Russia-Ukraine War) सुरु असलेल्या युद्धात रशियाचे (Russia) सुमारे 10,000 सैनिक मारले गेले आहेत. विशेष म्हणजे आकडेवारीसह हा दावा रशियाचे समर्थन करणाऱ्याच एका वृत्तपत्राने आपल्या संकेतस्थळावर केला आहे. दरम्यान, या वृत्तपत्राने ही आकडेवारी काही वेळातच आपल्या संकेतस्थळावरुन हटवली आहे. असे असले तरी या वृत्तपत्राने ही आकडेवरी आपल्या संकेतस्थळावरुन हववेपर्यंत या वृत्ताचा स्क्रिनशॉट इंटरनेटवर व्हायरल (Internet Viral) झाला आहे. Komsomolskaya Pravda नामक संकेतस्थळ हे रशियाचे समर्थक संकेतस्थळ म्हणून ओळखले जाते. या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तात रशियन संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, यूक्रेनच्या अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियाच्या मारल्या गेलेल्या सैन्याची संख्या दिली आहे त्यावरुन वाद सुरु आहे.
संकेतस्थळावरील वृत्ताच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने म्हटले आहे की, युक्रेनमध्ये त्यांचे 9861 सैनिक मारले गेले आहेत. तर 16,153 जखमी झाले आहेत. तर युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, रशियाचे 15,000 पेक्षाही अधिक सैनिक मारले गेले आहेत. 'द डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, यूक्रेनच्या समर्थक कर्मचाऱ्याचे काम मानले जात होते. रशियाने 2 मार्च रोजी अधिकृतपणे मान्य केले होते की, त्यांचे 498 सैनिक युक्रेनकडून मारले गेले आहेत. (हेही वाचा, Russia-Ukraine War: रशियाच्या लष्करी हल्ल्यात युक्रेनचा Mariupol Steel Plant उद्ध्वस्त; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)
दरम्यान, संबंधित संकेतस्थळाने आगोदरचे वृत्त हटवले असून ते अधिक सुरक्षीत (Archive ) केले आहे. या लेखात रशियाच्या लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या सांगितली आहे. दरम्यान, याच संकेतस्थळावर संपादित केलेल्या लेखामध्ये कोणत्याही प्रकारची आकडेवारी (मारल्या गेलेल्या रशियन सैन्याबद्दल) दिली नाही. लढाईत रशियाच्या पुढे कुच करण्याबाबतच्या काही वृत्तांचा लेखाजोका देण्यात आला आहे. या लेखानुसार रशियाच्या सैन्याने दो टँक, सहा फील्ड आर्टिलरी आणि मोर्टार नष्ट केल्या आहेत. तर यूक्रेनचे राष्ट्रवादी गटाचे सुमारे 60 आतंकवादी मारले आहेत.
यूक्रेनवर रशियाच्या आक्रमणाला आता एक महिना पूर्ण होईल. परंतू रशियाचे सैन्य अद्यापही युक्रेनची राजधानी कीववरती कब्जा मिळवू शकले नाही. दरम्यान, कीव शहर मात्र बॉम्ब, टँक आणि लष्करी कारवाईमुळे बेचिराक झाले आहे.
रशियाने 2 मार्च नंतर युक्रेनसोबतच्या लढाईत मारल्या गेलेल्या सैन्याचा अधिकृत आकडा सांगितला नाही. पाठीमागच्या दोन आठवड्यात 'द न्यूयॉर्क टाईम्स'ने दिलेल्या आकडेवारीत 7,000 रशियन सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते. ही संख्या इराक आणि अफगानिस्तानमध्ये संयुक्त रुपात 20 वर्षांमध्ये मारल्या गेलेल्या अमेरिकेच्या सैन्यापेक्षा अधिक आहे. सीएनएननेही रशियाच्या जखमी सैनिकांच्या संख्येबाबत दिलेल्या एका वृत्तात म्हटले आहे की, रशियाचे 3,000 ते 10,000 सैनिक मारले गेले आहेत.