पुण्यामध्ये एक तरूण इलेक्ट्रिक दुचाकीवर जीवघेणे स्टंट करतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. मुंबई-बेंगलोर हायवे च्या कात्रज-देहू रोड बायपास वरील हा व्हिडिओ आहे. सोशल मीडीयात हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या बेदरकारपणे गाडी चालवण्याच्या पद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. तर स्थानिक पोलिसांनीही कारवाई साठी टाळाटाळ केल्याने संताप व्यक्त होत आहे. जेथे हा प्रकार झाला तो रस्ता कोणत्या पोलुस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतो यावरून चालढकल केली जात असल्याचं समोर आलं आहे.
पुण्यात दुचाकीवर जीवघेणी स्टंटबाजी
#Pune: Youth Performs Bike Stunts on Highway; #PimpriChinchwad Police Dodge Responsibility Over Jurisdiction Confusion @CP_PCCity @PCcityPolice https://t.co/rxKErIWlWX pic.twitter.com/XMPWhH0g6X
— Punekar News (@punekarnews) May 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)