CM Devendra Fadnavis holds meeting (फोटो सौजन्य - X/@CMOMaharashtra)

India-Pakistan Tensions: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने भारतातील अनेक शहरात हल्ले करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताने पाकिस्ताचा डाव उधळून लावत हवेतचं पाकिस्तानी क्षेपणास्त्र नष्ट केले. दरम्यान, भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी एक आवश्यक सुरक्षा आढावा बैठक घेतली. ज्यामध्ये वरिष्ठ पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी 'वर्षा' येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा प्रोटोकॉलवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत डीजीपी, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध एजन्सी आणि विभागांचे इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. (हेही वाचा - Fake News Alert: दादर चौपाटी नागरिकांसाठी बंद राहणार असल्याचे फेक मेसेज WhatsApp Groups वर वायरल; पहा मुंबई पोलिसांचा खुलासा)

मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक - 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल आयोजित करून जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे निर्देश दिले. तसेच ब्लॅकआऊट वेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याच वेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा, असे निर्देश दिले.

तथापि, ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. याशिवाय, केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.