भारत -पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक खोट्या बातम्या, व्हिडिओ वायरल होत आहेत. अशामध्ये भारत सरकार कडून  दिशाभूल करणार्‍या वृत्तापासून दूर राहण्याचा आणि सरकारी माध्यमातून दिल्या जाणार्‍या माहितीवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप वर मुंबईतील दादर चौपटी नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचा एक मेसेज वायरल होत असल्याचं समोर आलं आहे. हे वृत्त खोटं असल्याचं मुंबई पोलिसांनी आता स्पष्ट केलं आहे. सार्‍या नागरिकांसाठी दादर चौपाटी खुली राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबतचा खुलासा त्यांनी X  Post  च्या माध्यमातून केला आहे. ATM Services Fake Message: एटीएम बंद करण्याबाबत खोटे मेसेज व्हायरल, पीआयबीकडून व्हाट्सअॅप दाव्याचे खंडण.   

दादर चौपाटी बंद असल्याचं वृत्त खोटं

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)