Shaym Vaze | Photo Credits: Facebook@AmitVaze

ज्येष्ठ अभिनेते आणि प्राध्यापक माधव वझे (Madhav Vaze) यांचे निधन झाले आहे. 1953 साली प्रदर्शित झालेल्या 'श्यामची आई' (Shyamchi Aai)  सिनेमामध्ये माधव वझे यांनी 'श्याम' याची भूमिका साकारली होती. आज पुण्यात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सिनेसृष्टी मध्ये त्यांचा प्रवास 'श्यामची आई' पासून सुरू झाला. पुढे त्यांनी बापजन्म, थ्री इडियट्स, डियर जिंदगी, छप्पर फाड या सिनेमामध्ये झळकले आहेत. 2013 साली त्यांनी परशूराम देशपांडे यांनी भाषांतरित केलेल्या 'हॅम्लेट' नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.

अभिनयासोबतच माधव वझे हे शिक्षण क्षेत्रामध्येही सक्रिय होते. पुण्यात ते नवरोजी वाडिया कॉलेज मध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते. वाडिया कॉलेज मधून ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.

माधव वझे यांचे निधन

माधव वझे यांनी प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी , नंदनवन पुस्तकं लिहिली आहेत. आज सायंकाळी त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा अमित वझे, पत्नी असा परिवार आहे. माधव वझे यांचा मुलगा अमित देखील दिग्दर्शक आहे. माधव वझे यांच्या निधनावर अनेक मराठी कलाकारांनी शोक व्यक्त करत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.