Russia-Ukraine War: रशियाच्या लष्करी हल्ल्यात युक्रेनचा Mariupol Steel Plant उद्ध्वस्त; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Russia-Ukraine War | (Photo Credits: Twitter)

रशियाने युक्रेनवरील हल्ले (Russia-Ukraine War) कायम ठेवले आहेत. युक्रेनचे दक्षिण-पूर्वेकडील शहर मॅरियूपोल (Mariupol ) येथे रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात जोरदार झटापट झाली. या वेळी रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचा स्टील प्लांट (Mariupol Steel Plant) उद्ध्वस्त झाला. युक्रेनमधील हा सर्वात मोठा स्टील प्लांट (Steel Plant) असल्याचे सांगितले जात आहे. रशियाच्या हल्ल्यात हा प्लांट मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाला. हा प्लांट उदध्वस्त होतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.

यूक्रेनचे खासदार लेसिया वासिलेंको यांनी ट्विट करत म्हटले आहेकी, 'यूरोपमधील सर्वात मोठ्या स्टील प्रकल्पांपैकी एक प्लांट आता नष्ट झाला आहे. ज्यामुळे युक्रेनला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. युक्रेनच्या पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे'. वासिलेंको यांनी आणखी एका औद्योगिक ठिकाणी झालेल्या स्फोटाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात इमारतींवर मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. रशियाने यूक्रेनच्या मारियुपोलला घेरले आहे. (हेही वाचा, Hypersonic Missile Attack in Ukraine: युक्रेनमध्ये हायपरसोनिक हल्ला; हे क्षेपणास्त्र किती धोकादायक आहे? भारताकडे अशी क्षमता आहे का? जाणून घ्या सविस्तर)

ट्विट

नागरि प्रशासनाचे प्रमुख पावलो किरिलेंको यांनी म्हटले आहे की, हजारो मॅरियूपोल नागरिक रशियाच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवू शकले. आता ते रशियाच्या कब्जात असलेल्या मानहुशी आणि मेलेकिन येथे भूकेने मरत आहेत. त्यांच्या दाव्यानुसार रशियन सैन्याने त्यांच्या पाणी आणि भोजनाची व्यवस्था करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना सुरक्षा पुरविण्यासही नकार दिला आहे. ज्यामुळे मॅरियूपोलमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आयुष्य प्रचंड कठीण बनले आहे.