King Cobra Entered In School Classroom (फोटो सौजन्य - X/@prabhakarjourno)

King Cobra Entered In School Classroom: ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील रायगड ब्लॉकमधील एसएसडी उच्च माध्यमिक शाळेत एक अतिशय धोकादायक आणि महाकाय किंग कोब्रा साप (King Cobra Snake) पकडण्यात आला. या सापाची लांबी सुमारे 15 फूट असल्याचे सांगितले जाते. हे बचाव कार्य गंजम जिल्ह्यातील चिकिती येथील स्नेक हेल्पलाइन टीमने केले. गेल्या काही दिवसांपासून हा किंग कोब्रा शाळेच्या आवारात फिरत होता, परंतु कोणीही त्याला पकडू शकले नाही.

सहावीच्या वर्गात शिरला साप -

दरम्यान, अचानक, जेव्हा हा साप थेट सहावीच्या वर्गात शिरला, तेव्हा शाळेतील कर्मचाऱ्यांनी साप बाहेर येऊ नये म्हणून लगेचच दरवाजा बंद केला. शाळा प्रशासनाने तात्काळ स्नेक हेल्पलाइनला कळवले. यानंतर साप सुमारे तीन तास त्याच खोलीत बंदिस्त राहिला. या घटनेची माहिती मिळताचं गंजम जिल्ह्यातील रामचंद्र साहू आणि जगन्नाथ साहू नावाचे दोन सर्पतज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले. दोघांनीही सुमारे अर्धा तासाच्या कठोर परिश्रम आणि सावधगिरीनंतर हा साप पकडला. (हेही वाचा - Snake in Margarita Cocktail: मार्गारीटा कॉकटेलमध्ये साप; मद्यपान करताना महिलेस धक्का)

क्लासरुममध्ये घुसला साप - 

तथापि, शाळेत साप शिरल्याची बातमी सगळीकडे पसरताच परिसरात मोठी गर्दी जमली. 15 फूट लांबीचा साप पाहून लोकांना धक्का बसला. स्नेक हेल्पलाइन सदस्यांनी या विषारी सापाला सुरक्षितपणे पकडले आणि नंतर त्याला जंगलातील एका निर्जन भागात सोडले. या संपूर्ण घटनेनंतर स्थानिक लोक सुटकेचा नि:श्वास सोडत आहेत. शाळा प्रशासनाने स्नेक हेल्पलाइनचे कौतुक केले आहे. किंग कोब्रा साप हा सर्वात धोकादायक प्रजातींपैकी एक मानला जातो.