Snake in Margarita | (Photo credit: archived, edited, representative image)

Virginia Restaurant Snake Incident: मद्यपानाचा आस्वाद घेत असताना कार्लेटा नावाच्या एका महिलेसोबत काहीशी धक्कादायक घटना घडली. ज्या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. घडले असे की, व्हर्जिनिया येथील एक महिला हेन्रिको काउंटी रेस्टॉरंटमध्ये मद्यपान (Unusual Restaurant Stories) करत होती. त्यासाठी तिने मस्तपैकी मार्गारीटा (Snake in Margarita) कॉकटेल मागवली. तिने त्याचे प्राशन सुरु केले. पण अद्याप त्याचा अंमल तिच्यावर व्हायचा होता. ती मार्गारीचा आस्वाद घेत असतानाच चक्क रेस्टॉरंटच्या छतावरुन एक सापाचे पिल्लू चक्क तिच्या ग्लासमध्येच पडले. पिल्लू छोटे असले तरी त्या महिलेच्या लक्षात आले. ज्यामुळे तिला जबर मानसिक धक्का बसला. तिने जेव्हा आपला आनुभव सार्वजनिक केला तेव्हा सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली. काय घडले नेमके घ्या जाणून.

काय घडले नेमके?

विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सँडस्टनमधील पॅट्रॉन मेक्सिकन रेस्टॉरंट आणि कॅन्टिना येथे ही विचित्र घटना 16 एप्रिल रोजी संध्याकाळी घडली. कार्लेटा नुकतीच तिचे जेवण संपवून पेय घेण्याच्या तयारीत असताना तिला कपाळावर काहीतरी हलकेच आदळल्याचे जाणवले. तिने 8 न्यूजशी बोलताना सांगितले की, 'मी एक घोट घेण्यासाठी ग्लास तोंडाला लावला आणि मला कपाळावर काहीतरी आदळल्याचे लक्षात आले. मी माझ्या पतीकडे असे पाहिले की - ते काय होते? मी माग मी खाली माझ्या ग्लासमध्ये पाहिले तर, मला माझ्या मार्गारीटामध्ये साप दिसला.'

सापाचे ग्लासला वेटोळे

आणखी वाईट म्हणजे, तो साप जिवंत होता आणि हालचाल करत होता. तो माझ्या ग्लासला वेटोळे घालत होता. नंतर मात्र माझ्यासमोर सर्व धुसर होत गेले आणि पुढे काय घडले ते मला अस्पष्टही आठवत नाही. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी काठीने सरपटणाऱ्या प्राण्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी दुसऱ्या जेवणाऱ्याने सापाला उचलले आणि बाहेर सोडले.

या आधीही घडल्यात अशा घटना

दरम्यान, धक्कादायक असले तरी, जेवणाशी संबंधित ठिकाणी साप येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातच, थायलंडमधील रेबान नाकलेंगबून नावाच्या एका माणसाला त्याच्या पॉप्सिकलमध्ये गोठलेला साप आढळला. बर्फात काळा-पिवळा सरपटणारा प्राणी स्पष्टपणे दिसत होता आणि रेबानने फेसबुकवर अस्वस्थ करणाऱ्या सापडलेल्या वस्तूचे फोटो शेअर केले.

या असामान्य घटना आपल्याला आठवण करून देतात: तुम्ही कॉकटेल पित असाल किंवा गोठवलेल्या पदार्थाचा आनंद घेत असाल, तुमच्या खाण्यापिण्यावर पुन्हा एकदा नजर टाकणे फायदेशीर ठरू शकते. अन्यथा आपल्यालाही काही विचित्र अनुभव मिळू शकतो.