पठाणकोट ते फाजिल्का पर्यंत पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये पठाणकोट, गुरुदासपूर, अमृतसर, तरनतारन, फिरोजपूर आणि फाजिल्का यांचा समावेश आहे. राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिले जात आहे. अंधार पडल्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे. जम्मूच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि पठाणकोटमध्येही वीजपुरवठा खंडित झाला आहे.
#WATCH | J&K | Red streaks seen and explosions can be heard as India's air defence intercepts Pakistani drones amid blackout in Samba.
(Visuals deferred by an unspecified time) pic.twitter.com/nDPV1ceQUD
— ANI (@ANI) May 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)