
Murali Naik Martyred In India-Pakistan War: मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. घाटकोपर (Ghatkopar) च्या कामराज नगर येथील रहिवासी असलेले लष्करी जवान मुरली नाईक (23) शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात शहीद (Murali Naik Martyred) झाले. जम्मू भागातील उरीजवळ पहाटे 3:00 वाजता हा हल्ला झाला. यावेळी मुरली नाईक तेथे ड्युटीवर होते. यासंदर्भात फ्री प्रेसने वृत्त प्रकाशित केलं आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील काफिदंडा गावातील रहिवासी असलेले मुरली नाईक 2022 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले होते. त्यांच्या शहीद होण्याने घाटकोपर परिसरात शोककळा पसरली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतातील विविध ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. 7 मे रोजी भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. प्रत्युत्तर म्हणून, गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानने विविध भारतीय सीमावर्ती भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या ड्रोन हल्ल्यात घाटकोपमधील मुरली नाईक यांनी आपला जीव गमवला. ( नक्की वाचा: BSF ने उधळला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सात दहशतवादी ठार (Watch Video).
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मुरली नाईक यांच्या निधनाबद्द शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'देशाच्या रक्षणासाठी श्री सत्य साई जिल्ह्यातील पेनुकोंडा विधानसभा मतदारसंघातील गोरंटला मंडल येथील मुरली नाईक नावाच्या सैनिकाच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. देशासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या शहीद मुरली नायक यांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.'
एन. चंद्राबाबू नायडू यांनी वाहिली श्रद्धांजली -
దేశ రక్షణలో శ్రీ సత్యసాయి జిల్లా, పెనుకొండ శాసనసభ నియోజకవర్గం, గోరంట్ల మండలానికి చెందిన మురళి నాయక్ అనే సైనికుడు ప్రాణాలు కోల్పోవడం విషాదకరం. దేశం కోసం ప్రాణాలర్పించిన అమరవీరుడు మురళి నాయక్ కు నివాళులు. ఆయన కుటుంబ సభ్యులకు ప్రగాఢ సానుభూతిని తెలియజేస్తున్నాను. pic.twitter.com/QGtIAxMjug
— N Chandrababu Naidu (@ncbn) May 9, 2025
स्थानिक संघटना आणि राजकीय नेत्यांनीही वाहिली शहीद सैनिकाला श्रद्धांजली -
घाटकोपर पूर्व विभागातील कामराज नगरचे भारतीय सैन्य दलात कार्यरत कु. मुरली नाईक याचे काल रात्री भारत-पाकिस्तान मध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली,त्यात त्याला वीरगती प्राप्त झाली.देशासाठी शहिद झालेल्या घाटकोपरच्या या धाडसी सुपुत्रास अखेरचा जय हिंद. llभावपूर्ण श्रद्धांजलीll. pic.twitter.com/7ZsZVzY54k
— ABVP Ghatkopar (@ABVP_Ghatkopar) May 9, 2025
आज पहाटे ३ वाजता, घाटकोपर पूर्व कामराज नगरचे शूर जवान मुरली नाईक भारत-पाक युद्धात शहीद झाले.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.#श्रद्धांजली 🙏#वीरगती #IndianArmyForces #SaluteToMartyrs #IndiaPakistanWar2025 pic.twitter.com/KU1wGpGyjV
— Dharmesh J Soni (@DJSoniSpeaks) May 9, 2025
याशिवाय, स्थानिक संघटना आणि राजकीय नेत्यांनीही शहीद सैनिकाला श्रद्धांजली वाहिली आहे. ABVP घाटकोपरने X वर एका पोस्टमध्ये शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली, तर भाजप नेते गणेश कुंदर आणि काँग्रेसचे पदाधिकारी धर्मेश जे. सोनी यांनी नाईक यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. नाईक यांचे कुटुंबीय सध्या आंध्र प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी राहतात.