Maharana Pratap Jayanti 2025 Wishes (फोटो सौजन्य - File Image)

Maharana Pratap Jayanti 2025 Wishes in Marathi: महाराणा प्रताप हे देशावर राज्य करणाऱ्या महान राजांपैकी एक आहेत. शौर्य, धैर्य आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांनी आपल्या राज्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी अनेक लढाया लढल्या. महाराणा प्रताप हे राजस्थानातील मेवाड येथील हिंदू राजपूत राजा होते. ते राजपूतांच्या सिसोदिया कुळातील होते. दरवर्षी, महाराणा प्रताप यांची जयंती (Maharana Pratap Jayanti 2025) देशभरात आणि विशेषत: राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात आणि भव्यतेने साजरी केली जाते.

महाराणा प्रताप हे खूप स्वाभिमानी स्वभावाचे होते. त्यामुळे अकबराच्या अनेक प्रयत्नांनंतरही त्यांनी अकबराशी तह केला नाही. महाराणा प्रताप यांनी अनेक युद्धांमध्ये आपले अदम्य धैर्य दाखवले आणि प्रत्येक वेळी शत्रूंचा पराभव केला. इंग्रजी कॅलेंडरनुसार, महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी झाला होता. त्यामुळे 9 मे रोजी देशभरात महाराणा प्रताप जयंती यांची जयती साजरी करण्यात येईल. महाराणा प्रताप जयंतीनिमित्त तुम्ही खालील महाराणा प्रताप कोट्स, महाराणा प्रताप जयंती व्हॉट्सॲप स्टेटस, महाराणा प्रताप फोटोज, महाराणा प्रताप जयंती संदेश शेअर करून त्यांच्या स्मृतीस वंदन करून हा दिवस आणखी खास करू शकता.

महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा - 
रणांगणामध्ये ज्यांनी कधी पाठ फिरवली नाही
ज्याची गाथा हे चंद्र सूर्य तारे आहेत तिथं पर्यंत
ऐकवली जाईल अशा वीर पराक्रमी राजा
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा!

Maharana Pratap Jayanti 2025 Wishes 1 (फोटो सौजन्य - File Image)

महान योद्धा आणि राज्यकर्ता
ज्यांनी राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी
आपल्या प्राणाची आहुती दिली,
पण ते अधर्मापुढे झुकले नाही.
अशा शूर शिरोमणी महाराणा प्रताप यांना कोटी कोटी प्रणाम!
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा!

Maharana Pratap Jayanti 2025 Wishes 2 (फोटो सौजन्य - File Image)

आनंदाने आणि साधेपणाने जगण्यात हे आयुष्य वाया घालवण्यापेक्षा देशाची सेवा करणे चांगले.
महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharana Pratap Jayanti 2025 Wishes 3 (फोटो सौजन्य - File Image)

महाराणा प्रताप यांचे सामर्थ्य आणि शौर्य
येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.
ते नेहमीच आपल्या हृदयात राहतील.
सर्वांना महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा!

Maharana Pratap Jayanti 2025 Wishes 4 (फोटो सौजन्य - File Image)

भारतमातेचा वीरपुत्र, प्रत्येक हिंदुस्थानीचे लाडके
महाराणा प्रतापजींच्या चरणी नमन...
महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharana Pratap Jayanti 2025 Wishes 5 (फोटो सौजन्य - File Image)

मेवाडचे शासक महाराणा उदयसिंह द्वितीय यांच्या पोटी जन्मलेले महाराणा प्रताप त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गादीवर बसले. सिंहासनावर आरोहण केल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक लढाया लढल्या आणि देशासाठी पहिले स्वातंत्र्ययुद्धही केले. ते हल्दीघाटीच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे, जिथे त्याने मुघल सम्राट अकबराशी लढा दिला होता.