Rishi Sunak Meet With PM Giorgia Meloni (PC - X/ANI)

Rishi Sunak Meet With PM Giorgia Meloni: G-7 मध्ये सामील होणाऱ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे इटलीत आगमन सुरू झाले आहे. गुरुवारी, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (PM Giorgia Meloni) यांनी देशाच्या पुगलिया प्रदेशातील बोर्गो एग्नाझिया येथे सात राष्ट्रांच्या गटाच्या नेत्यांचे स्वागत केले. G7 मध्ये अमेरिका, जपान, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. युरोपियन युनियन देखील G7 च्या सर्व चर्चेत भाग घेणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) हे देखील इटलीला पोहोचले आहेत. त्यांनी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची खास भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्यो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटल्यावर प्रेमळ मिठी मारली. सध्या या भेटीचा व्हिडिओचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही नेत्यांच्या या व्हिडिओवर नेटीझन्सनी अनेक मजेशीर मीम्स पोस्ट केले आहेत. (हेही वाचा -G7 Summit: G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी इटलीला रवाना; तिसऱ्या कार्यकाळातील मोदींचा पहिला विदेश दौरा)

पहा व्हिडिओ - 

जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं आहे की, 'आम्हाला संदेश द्यायचा आहे की इटलीला जागतिक दक्षिणेकडील देशांशी संवाद मजबूत करायचा आहे. आम्ही हे केले कारण ही भूमी ऐतिहासिकदृष्ट्या पश्चिम आणि पूर्व यांच्यातील पूल आहे. जगाच्या मध्यभागी दळणवळणाची भूमी आहे, म्हणजेच एका बाजूला अटलांटिक आणि दुसऱ्या बाजूला इंडो-पॅसिफिक समुद्र आहे.

इटलीने यावर्षी जॉर्डनचे राजा पोप फ्रान्सिस तसेच युक्रेन, भारत, ब्राझील, अर्जेंटिना, तुर्की, संयुक्त अरब अमिराती, केनिया, अल्जेरिया, ट्युनिशिया आणि मॉरिटानियाच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. महत्त्वाच्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. पुगलियाच्या दक्षिणेकडील भागात बोर्गो एग्नाझिया येथे ही परिषद होत आहे.

2024 च्या G7 शिखर परिषदेचा अजेंडा -

शिखर परिषदेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सत्रात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की देखील सामील होते. त्यानंतर संभाषण मध्य पूर्वेवर केंद्रित होते. दुसऱ्या दिवशी भूमध्यसागरीय, ऊर्जा आणि आफ्रिका, स्थलांतर, इंडो-पॅसिफिक आणि आर्थिक सुरक्षा या विषयांवर सत्रे होतील. यानंतर पोप फ्रान्सिस आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चर्चेचे नेतृत्व करतील. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन युक्रेनसोबत नवीन सुरक्षा करारावर स्वाक्षरी करतील.